Lokmat Sakhi >Social Viral > चिकट मायक्रोवेव्ह चकाचक करण्याची सोपी ट्रिक, कुबट वास-झुरळं होतील गायब

चिकट मायक्रोवेव्ह चकाचक करण्याची सोपी ट्रिक, कुबट वास-झुरळं होतील गायब

Easy steps to clean dirty microwave oven cleaning tips : मायक्रोवेव्हचा उपयोग होत असला तरी तो वेळच्यावेळी स्वच्छ करणे गरजेचे असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2024 03:49 PM2024-09-29T15:49:39+5:302024-09-29T15:54:49+5:30

Easy steps to clean dirty microwave oven cleaning tips : मायक्रोवेव्हचा उपयोग होत असला तरी तो वेळच्यावेळी स्वच्छ करणे गरजेचे असते.

Easy steps to clean dirty microwave oven cleaning tips : A simple trick to make sticky microwaves shine, musty smells - cockroaches will disappear | चिकट मायक्रोवेव्ह चकाचक करण्याची सोपी ट्रिक, कुबट वास-झुरळं होतील गायब

चिकट मायक्रोवेव्ह चकाचक करण्याची सोपी ट्रिक, कुबट वास-झुरळं होतील गायब

मायक्रोवेव्ह ओव्हन ही आता प्रत्येक घरातली गरज झाली आहे. प्रत्येकाच्या जेवणाच्या वेळा आणि घाई यामुळे झटपट पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर सर्रास होताना दिसतो. अगदी बेकींग किंवा ग्रिलिंगचे पदार्थ त्यामध्ये नियमित केले जात नसतील तरी चहा, पाणी, तयार पदार्थ गरम करण्यासाठी मात्र आवर्जून मायक्रोवेव्ह वापरला जातो. लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठीही हे उपकरण उपयुक्त ठरते.काम झटपट होण्यासाठी मायक्रोवेव्हचा उपयोग होत असला तरी तो वेळच्यावेळी स्वच्छ करणे, सर्व्हिसिंग करणे अशी कामेही करावीच लागतात.  आपल्या आरोग्यासाठी ते फायद्याचे असते (Easy steps to clean dirty microwave oven cleaning tips).

(Image : Google)
(Image : Google)

काही वेळा घाईत आपल्याकडूनच मायक्रोवेव्हमध्ये काही ना काही सांडते आणि तो खराब होतो. इतकेच नाही तर काही पदार्थ आतमध्ये गरम करताना एकदम सगळीकडे उडतात. हे पदार्थ आत तसेच राहीले तर मायक्रोवेव्हमध्ये कुबट वास येतो आणि नंतर आतमध्ये झुरळं, मुंग्या, चिलटं होतात. मायक्रोवेव्ह वापरणे सोपे असले तरी तो साफ करणे हे अनेकदा जिकरीचे काम असते. त्याचा आतला भाग तुलनेने लहान असल्याने आणि कोपरे असल्याने याठिकाणी सांडलेले चिकट, तेलकट अन्नाचे कण साफ करताना थोडी कसरत होते. वेळच्या वेळी हे सांडलेले साफ केले नाही तर नंतर ते काढणे अवघड होऊन जाते. म्हणूनच मायक्रोवेव्ह कमीत कमी कष्टात सोप्या पद्धतीने साफ करण्याची सोपी ट्रिक पाहूया...

 १. काचेच्या एका पसरट बाऊलमध्ये २ कप पाणी घ्यायचे.

२. त्यामध्ये एक चमचा लिक्विड डिश सोप आणि एक कप लिंबाचा रस घालायचा

(Image : Google)
(Image : Google)

३. हे मिश्रण चांगले एकत्र करून तो बाऊल  मायक्रोवेव्ह ५ मिनिटांसाठी गरम करण्यास ठेवायचे.

४. नंतर मायक्रोवेव्ह बंद करून हे गरम झालेले मिश्रण आतमध्ये १५ मिनिटे तसेच ठेवायचे.

५. या मिश्रणाच्या वाफेमुळे आतले चिकट, मेणचट डाग निघून येण्यास मदत होते. ओल्या स्पंज किंवा कापडाने मायक्रोवेव्ह स्वच्छ पुसून घ्यावा.


Web Title: Easy steps to clean dirty microwave oven cleaning tips : A simple trick to make sticky microwaves shine, musty smells - cockroaches will disappear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.