Lokmat Sakhi >Social Viral > कॉलरवरचे हट्टी डाग निघता निघत नाही? १ ट्रिक वापरा, न घासता पांढरीशुभ्र-नवी दिसेल कॉलर

कॉलरवरचे हट्टी डाग निघता निघत नाही? १ ट्रिक वापरा, न घासता पांढरीशुभ्र-नवी दिसेल कॉलर

How To Clean Shirt Collar : पांढऱ्या रंगाचे शर्ट घातल्याने तुमची पर्सनॅलिटी खुलून दिसते. पण पांढरे कपडे मेंटेन करणं खूपच कठीण असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 04:18 PM2024-07-05T16:18:07+5:302024-07-05T16:23:54+5:30

How To Clean Shirt Collar : पांढऱ्या रंगाचे शर्ट घातल्याने तुमची पर्सनॅलिटी खुलून दिसते. पण पांढरे कपडे मेंटेन करणं खूपच कठीण असते.

Easy Tips To Clean Shirt Collar With Lemon And Toothpaste | कॉलरवरचे हट्टी डाग निघता निघत नाही? १ ट्रिक वापरा, न घासता पांढरीशुभ्र-नवी दिसेल कॉलर

कॉलरवरचे हट्टी डाग निघता निघत नाही? १ ट्रिक वापरा, न घासता पांढरीशुभ्र-नवी दिसेल कॉलर

ऑफिस असो किंवा पार्टी पांढऱ्या रंगाचे कपडे घालायला सर्वांनाच आवडतात. ऑफिसमध्ये बरेचजण फॉर्मल कपडे घालतात तेव्हा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं पसंत करतात. (Home Hacks) पांढऱ्या रंगाचे शर्ट घातल्याने तुमची पर्सनॅलिटी खुलून दिसते. पण पांढरे कपडे मेंटेन करणं खूपच कठीण असते. (How To Clean Shirt Collar)

शर्टाची घाणेरडी कॉलर स्वच्छ करणं हे प्रत्येकासाठीच  महत्वाचे काम आहे. अनेकदा मेहनत करून ही कॉलरवरचे डाग पूर्ण निघत नाहीत. एकटे राहणाऱ्या लोकांना कॉलर साफ करणं ही मोठी समस्या वाटते. पण सोप्या टिप्स वापरून तुम्ही ब्रशचा वापर न करता कपडे स्वच्छ करू शकता. मेहनत न करता डाग स्वच्छ होतील. (Cleaning Hacks & Tips)

शर्टाची कॉलर चमकवण्याची योग्य पद्धत (How To Clean Shirts Collar)

शर्टाची कॉलर स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर काही टिप्सनी तुम्ही कॉलर चमकवू शकता. यासाठी सगळ्यात आधी शर्ट पाण्यात भिजवून अर्ध्यासाठी तसंच सोडून द्या.  त्यानंतर कॉलरवर टुथपेस्ट लावून १ चमचा मीठ शिंपडा. नंतर कॉलर हाताने रगडून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

तुम्हाला दिसेल की डाग पूर्णपणे निघून गेले आहेत.  लिंबू आणि मीठ लावल्यानंतर तुम्ही  कोणत्याही डिटर्जंट पावडरचाही वापर करू शकता. एकदा  कॉलर या उपायाने स्वच्छ केली तर नेहमीच हा उपाय  तुम्ही कराल.  शर्टाच्या कॉलरवर लागलेले हट्टी डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही टुथपेस्ट आणि लिंबाचा वापर करू शकता.

यासाठी सगळ्यात आधी कपड पाण्यात भिजवून घ्या.   एका भांड्यात टुथपेस्ट आणि एक चमचा लिंबाच रस घ्या. या चमच्याच्या मदतीने शर्टाच्या कॉलरवर लागलेले डाग काढून टाका नंतर लिंबाच्या सालीने रगडून घ्या. तुम्हाला दिसेल की शर्टावर लागलेले डाग पूर्ण निघून जातील. 

Web Title: Easy Tips To Clean Shirt Collar With Lemon And Toothpaste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.