लिंबाचा रस रोजच्या स्वंयपाकात अनेकदा वापरला जातो. (Home Hacks) लिंबाचा रस काढून झाल्यानंतर लिंबू फेकून दिला जातो. लिंबाचे साल अनेकजण कुकरमध्ये घालतात जेणेकरून कुकर काळा होणार नाही. लिंबाचे सालं तुमच्यासाठी जास्तीत जास्त फायदेशीर ठरू शकते. (Easy Tips To Reuse Lemon Peels) लिंबाच्या सालीचे उपयोग कसे करता येतील ते पाहूया. लिंबाच्या रसाने तुम्ही घरातील कोणत्याही वस्तू चमकवू शकता. ज्यामुळे हट्टी डाग चुटकीसरशी निघून जातील. बाथरूमधिल मग, बादल्या स्वच्छ करता येतील. (Easy Ways To Use Lemon Peel in The Kitchen)
या उपायाने तुम्ही घरातील बादल्या नव्यासारख्या चमकवू शकता. यासाठी लिंबाची सालं पाण्यात उकळून थोड्या वेळासाठी तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी हलकं गरम करा त्यानंतर नळ आणि बादली स्वच्छ करून घ्या. या उपायाने नळ आणि बादल्या अगदी नव्यासारख्या चमकतील.
लाकडाची भांडी त्वरीत स्वच्छ होतील
लाकडाचा चमच्यांवर लागलेले हळदीचे पिवळे डाग सहज स्वच्छ करता येतात. हे दिसायला खूपच खराब दिसते. हे साफ करण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर करा. सगळ्यात आधी एका भांड्यात अर्धा ग्लास पाणी घालून त्यात लिंबू घालून उकळवून घ्या. हे पाणी थंड करून त्यात लाकडाची भांडी घाला. ५ ते १० मिनिटं तसंच सोडल्यानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करून घ्या. या उपायाने चमच्यावरील डाग सहज निघून जातील.
बाथरूम बेसिन आणि किचनचे सिंक स्वच्छ करा
एका भांड्यात लिंबाची सालं घालून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर पाणी सिंक, बाथरूम आणि बेसिनमध्ये घाला. ही क्रिया करताना तोंडाला कापड बांधा. ज्यामुळे बेसिनवरची वाफ उडून निघून जाईल आणि घाण शरीरात जाणार नाही. ब्रशच्या मदतीने बेसिन रगडून स्वच्छ करा. ही करताना तुम्हाला साबण किंवा डिटर्जेंटचची गरज लागणार नाही. कारण या उपायाने डाग पूर्णपणे निघून जातील.
लिंबाचे साल आणि बेकिंग साोडा
झुरळांना पळवून लावण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबू मिसळून एक स्प्रे तयार करा. हा स्प्रे बनवण्यासाठी १ लिटर गरम पाण्यात २ चमचे बेकींग सोडा आणि एक लिंबू पिळून घाला लिंबाऐवजी तुम्ही यात लिंबाचे साल घालू शकता. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून झुरळांवर शिंपडा. या उपायाने झुरळं मरून जातील.