दिवाळी (Deepavali) येताच आपण साफसफाईला सुरुवात करतो (Diwali 2024). काहींकडे साफसफाई झालीही असेल, तर, काहींची अजून बाकी असेल (Cleaning Tips). घरची स्वच्छता करताना, फरशी, बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करणं कठीण वाटतं (Bathroom and Toilet). कारण बाथरूम आणि टॉयलेटवरचे हट्टी पिवळट डाग कधी कधी घासूनही निघत नाही.
टॉयलेट, बाथरूम आणि फरशीचे डाग - बॅक्टेरिया काढण्यासाठी आपण केमिकल उत्पादनांचा वापर करतो. जे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. शिवाय या उत्पादनांचा वापर करूनही टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ होत नाही. जर बाथरूम आणि टॉयलेटची फरशी उत्पादनांचा वापर करूनही स्वच्छ होत नसेल तर, कोल्डड्रिंकचा वापर करून पाहा. यामुळे स्वच्छता सोपी होईल(Easy Toilet Cleaning Hacks Using Cold Drink ).
फरशी स्वच्छ करण्यासाठी कोल्डड्रिंकचा वापर कसा करावा?
बाथरूम
बाथरूम स्वच्छ करण्यासाठी कोल्ड ड्रिंकचा वापर केला जाऊ शकतो. घरात टॉयलेट क्लीनर नसेल तर तुम्ही कोल्ड ड्रिंकने बाथरूम स्वच्छ करू शकता. नंतर त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. काही वेळ तसेच राहू द्या. नंतर ब्रशने घासा. आणि पाण्याने बाथरूम स्वच्छ करा. अशा प्रकारे मिनिटात बाथरूम क्लिन होईल.
टाईल्स
फरशी पुसण्यासाठी आपण कोल्ड ड्रिंकचा वापर करू शकता. यासाठी टाईल्सवर कोल्ड ड्रिंक ओता. नंतर ब्रशने घासा. यामुळे टाईल्सवर पडलेले डाग चटकन दूर होतील. नंतर पाण्याने फरशी पुसून घ्या. आपण कोल्डड्रिंकने आठवड्यातून एकदा फरशी पुसू शकता.
टॉयलेट
टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आपण कोल्डड्रिंकचा वापर करू शकता. यासाठी टॉयलेट पॉटमध्ये काही वेळ कोल्डड्रिंक टाकून ठेवा. नंतर ब्रशने टॉयलेट स्वच्छ करा. या युक्तीमुळे टॉयलेट मिनिटात स्वच्छ होईल. शिवाय पिवळट डागही राहणार नाहीत.
कपड्यांवरील डाग
कपड्यांवर जर हट्टी डाग असतील जसे की, ग्रीस किंवा तेलाचे चिकट डाग. हे डाग काढण्यासाठी आपण कोल्डड्रिंकचा वापर करू शकता. यासाठी डागांवर कोल्डड्रिंक लावा. काही वेळ तसेच राहू द्या. नंतर ब्रशने घासा. आणि पाण्याने कपडे धुवून घ्या. मिनिटात कपड्यांवरचे डाग गायब होतील.