Join us  

टॉयलेटमधले खूप दुर्गंधी येते? १० रुपयांत करा टॉयलेट चकाचक, दुर्गंध होईल गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2024 11:55 AM

Easy toilet cleaning tips : पाहा टॉयलेट क्लिनर आणि फ्रेशनर तयार करण्याची सोपी पद्धत...

घरात आपण बेडरुम, किचन यांचा ज्याप्रमाणे वापर करतो त्याचप्रमाणे नैसर्गिक क्रियांसाठी टॉयलेटचा वापर करतो. घराची साफसफाई करताना टॉयलेट-बाथरुमची सफाई करणे अतिशय महत्त्वाचे असते. चांगले दिसण्यासाठी तर टॉयलेट साफ करायला हवेच पण आरोग्याच्यादृष्टीनेही स्वच्छता राहावी यासाठी टॉयलेट स्वच्छ हवे. घरात जास्त लोक असतील तर जास्त वापराने टॉयलेट लवकर खराब होते. येथील भांडे आणि टाइल्स पिवळ्या पडायला लागतात. इतकेच नाही तर टॉयलेटमध्ये एकप्रकारचा वासही यायला लागतो. मग आपल्याला हे टॉयलेट वापरणे नकोसे वाटायला लागते (Easy toilet cleaning tips). 

रोजच्या धावपळीत आपल्याकडे टॉयलेट साफ करायला वेळ असतोच असे नाही त्यामुळे आपण अगदी रोज नाही तरी घाईगडबडीत २ ते ३ दिवसांनी किंवा आठवड्यानी टॉयलेट साफ करतो. मात्र त्यावेळीही हा पिवळटपणा निघतोच असे नाही. तसेच याठिकाणी येणारा वासही नकोसा व्हायला लागतो. टॉयलेटच्या सफाईसाठी बहुतांश जण बाजारात रेडीमेड मिळणारे क्लिनर वापरतात. पण काही सोप्या हॅक्स वापरल्या तर टॉयलेट रेडीमेड क्लिनरपेक्षाही झटपट आणि जास्त स्वच्छ होऊ शकते. 

टॉयलेट क्लिनर बॉल तयार करा...

१. एका बाऊलमध्ये पिठीसाखर आणि बेकींग सोडा घ्या.

२. यामध्ये टॉयलेट क्लिनर घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा. 

(Image : Google)

३. या मिश्रणाचे गोल किंवा चौकोनी आकार तयार करुन ते एका ताटलीत ठेवा.

४. काही वेळाने हे बॉल घट्टसर होतील त्यानंतर ते टॉयलेट सीटवर ठेवा. 

टॉयलेट फ्रेशनर तयार करण्याची पद्धत..

१. एका भांड्यात १ कप पाणी घेऊन त्यात २.५ चमचे जिलेटीन घाला. 

२. हे मिश्रण गॅसवर ठेवून गरम करा. 

३. मग यामध्ये १ चमचा मीठ घालून ते गार होण्यासाठी ठेवून द्या. 

४. गार झाल्यावर यामध्ये आपल्या आवडीचे इसेन्शिअल ऑईल घाला.

५. आता हे भांडे २४ तासांसाठी तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते टॉयलेटमध्ये ओपन करुन ठेवल्यास टॉयलेटमध्ये चांगला वास येण्यास मदत होईल. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी