सोफासेट ही आपल्या लिव्हिंग रूम म्हणजेच हॉलमध्ये असणारी एक महत्त्वाची गोष्ट असते. येणाऱ्या पाहुण्यांना बसण्यासाठी आपण ही व्यवस्था केलेली असते. यामध्ये लाकडी, मेटल, पावडर कोटिंग असे विविध प्रकारचे सोफे असतात. सोफा कोणताही असला तरी त्याच्या कव्हरला कुशन म्हणजेच एकप्रकारची गादी असते. या गादीवर कापडाचे असणारे कव्हर काढता येण्यासारखे असले तर ठीक. नाहीतर त्यावर बसून, काही ना काही सांडून हे कव्हर खराब होतात.धुळ बसल्यानेही हे कव्हर खराब व्हायला लागतात (Easy trick of sofa cleaning).
ही धुळ आपल्या नाकातोंडात जाऊ नये आणि स्वच्छता राहावी यासाठी सोफा वेळच्या वेळी साफ करणे आवश्यक असते. आता हे कव्हर काढता येणार नसेल तर सोफा साफ कसा करणार असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर आज घरच्या घरी सोफा साफ करण्याची एक सोपी ट्रिक आपण पाहणार आहोत. या ट्रीक सोफा अगदी कमी वेळात स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. पाहुयात ही ट्रिक कोणती ...
१. एका बादलीत कोमट पाणी घ्यायचे आणि त्यात कोणताही लिक्वीड साबण साधारण २ चमचे आणि फॅब्रिक सॉफ्टनर घालायचा.
२. एक वाटी किंवा कोणतेही एखादे झाकण घेऊन त्यावर एक फडके गुंडाळायचे.
३. ही कापड लावलेली वाटी किंवा झाकण या पाण्यात घालायची आणि ओली करून त्याने सोफा सगळीकडून स्वच्छ पुसून घ्यायचा
४. यामुळे सोफ्यावर आणि सोफ्याच्या कोपऱ्यात अडकलेली धूळ कापडाला लागते आणि सोफा झटपट साफ होण्यास मदत होते.
५. एरवी आपण सोफा झटकतो किंवा वरचेवर साफ करतो. पण अशाप्रकारे साफ केल्याने त्यावर अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होते.