Lokmat Sakhi >Social Viral > मेथी आणली की वाळते नाहीतर कुजते? मेथी साठवण्याची १ सोपी ट्रिक, बरेच दिवस टिकेल पालेभाजी...

मेथी आणली की वाळते नाहीतर कुजते? मेथी साठवण्याची १ सोपी ट्रिक, बरेच दिवस टिकेल पालेभाजी...

Easy trick to clean and store methi fenugreek for long : मेथीची भाजी अशी वाया जाऊ नये आणि जास्तीत जास्त दिवस टिकावी यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 12:32 PM2024-02-12T12:32:42+5:302024-02-12T12:34:15+5:30

Easy trick to clean and store methi fenugreek for long : मेथीची भाजी अशी वाया जाऊ नये आणि जास्तीत जास्त दिवस टिकावी यासाठी

Easy trick to clean and store methi fenugreek for long : Does fenugreek dry or rot? 1 easy trick to store fenugreek, the leafy vegetable will last for long... | मेथी आणली की वाळते नाहीतर कुजते? मेथी साठवण्याची १ सोपी ट्रिक, बरेच दिवस टिकेल पालेभाजी...

मेथी आणली की वाळते नाहीतर कुजते? मेथी साठवण्याची १ सोपी ट्रिक, बरेच दिवस टिकेल पालेभाजी...

पालेभाजी बाजारातून आणली की अगदी २ दिवसांत वाळून जाते. कधी ती कोरडी झाल्याने सुकते तर कधी पिवळी पडते. भाजीत थोडा जरी ओलसरपणा असला तर ती सडायला लागते.अशी पिवळी  पडलेली, सुकलेली किंवा सडलेली भाजी वापरायला नको वाटते. पालक, मेथी यांसारख्या भाज्यांच्या जुड्या काहीवेळा इतक्या मोठ्या असतात की २ ते ३ व्यक्ती घरात असतील तर त्या २ वेळा वापराव्या लागतात. तसंच एक भाजी एकदा खाल्ली की लगेचच आपण ती खात नाही म्हणून आपण ती ठेवून देतो आणि २-३ दिवासंच्या गॅपने करण्याचा प्लॅन करतो (Easy trick to clean and store methi fenugreek for long).  

पण भाजी खराब झाली तर ती टाकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे भाजी वाया तर जातेच पण पैसे देऊन आणल्याने ते पैसेही वाया जातात. मेथी आरोग्यासाठी चांगली असल्याने आपण आठवडा किंवा पंधरवड्याने आवर्जून मेथी आणतो. पण २०-३० रुपयांना आणलेली ही भाजी निवडून फ्रिजमध्ये ठेवूनही वाया गेली की मात्र आपल्याला वाईट वाटते. मेथीची भाजी अशी वाया जाऊ नये आणि जास्तीत जास्त दिवस टिकावी यासाठी आज आपण १ सोपा उपाय पाहणार आहोत. यामुळे भाजी चक्क ८-१० दिवस टिकण्यास मदत होते. पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा. 

१. सगळ्यात पहिल्यांदा मेथीची जुडी मोकळी करुन आपण नेहमीप्रमाणे ती निवडतो त्याप्रमाणे देठं काढून निवडून घ्यायची. भाजी निवडताना त्यातील पिवळी पडलेली किंवा ओलसर झालेली पाने व्यवस्थित काढून टाकायची. 

२. पाने जास्तच ओलसर असतील तर निवडल्यावर ती सुती कापडावर किंवा कागदावर पसरुन  योग्य पद्धतीने वाळवायला हवीत.  कारण एक जरी ओलसर पान त्यात गेले तर आजुबाजूची सगळी पाने ओली होतात आणि भाजी सडते.

३. मग ही निवडलेली मेथी एका एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवायची जेणेकरुन तिला बाहेरची हवा लागणार नाही. 

४. स्वच्छ कोरडा केलेला हवाबंद डबा घेऊन त्यामध्ये खाली टिश्यू पेपर घालायचा आणि त्यामध्ये मेथी ठेवायची. 

५. मध्यभागी पुन्हा टिश्यू पेपर घालून पुन्हा त्यावर मेथी घालायची. असे २ ते ३ लेअर करायचे आणि डब्याचे झाकण घट्ट बंद करुन डबा फ्रिजमध्ये ठेवायचा.

६. अशाप्रकारे मेथी ठेवली की ती ८ ते १० दिवस चांगली टिकते. ३-४ दिवसांनी एकदा डबा उघडून टिश्यू पेपर ओलसर झाला असेल तर तो बदलायचा.  
 

Web Title: Easy trick to clean and store methi fenugreek for long : Does fenugreek dry or rot? 1 easy trick to store fenugreek, the leafy vegetable will last for long...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.