Lokmat Sakhi >Social Viral > स्टीलची जळकी-करपलेली भांडी साफ करण्याची १ सोपी ट्रिक, ५ मिनीटांत भांडी चकाचक...

स्टीलची जळकी-करपलेली भांडी साफ करण्याची १ सोपी ट्रिक, ५ मिनीटांत भांडी चकाचक...

Easy trick to clean burned steel utensils : काळे झालेले भांडे घासण्यासाठी खूप जोर द्यावा लागू नये यासाठी सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 06:29 PM2024-02-20T18:29:48+5:302024-02-21T18:42:34+5:30

Easy trick to clean burned steel utensils : काळे झालेले भांडे घासण्यासाठी खूप जोर द्यावा लागू नये यासाठी सोपा उपाय...

Easy trick to clean burned steel utensils : Easy trick to clean dirty steel utensils, in 5 minutes the utensils will be shiny... | स्टीलची जळकी-करपलेली भांडी साफ करण्याची १ सोपी ट्रिक, ५ मिनीटांत भांडी चकाचक...

स्टीलची जळकी-करपलेली भांडी साफ करण्याची १ सोपी ट्रिक, ५ मिनीटांत भांडी चकाचक...

आपण स्वयंपाकघरात वेगवेगळ्या धातूची भांडी वापरतो. कधी दुर्लक्ष झाल्याने तर कधी आणखी काही कारणाने गॅसवर एखादे भांडे जळते आणि काळेकुट्ट होते. यामुळे पदार्थ तर करपतोच पण त्यासाठी वापरलेले भांडेही काळे होते. याशिवाय तुपाचे, चहाचे, दुधाचे भांडे तर आपल्याकडून हमखास काळे होते. हे काळे झालेले भांडे घासण्यासाठी खूप जोर द्यावा लागतो. कितीही चांगला साबण किंवा लिक्विड सोप वापरुही अनेकदा हे जळलेले डाग निघत नाहीत. अशावेळी काळे डाग पडलेली भांडी दुसऱ्या पदार्थासाठी वापरणेही शक्य नसते. मग ते घासण्यासाठी नेमकं काय करावं आणि त्यासाठी नेमकी कोणती ट्रिक वापरावी हे माहित असेल तर जळालेली भांडी घासणे सोपे होते. पाहूयात अशीच एक सोपी ट्रिक (Easy trick to clean burned steel utensils)...

१. करपलेल्या भांड्यावर बेकींग सोडा घालून तो सगळीकडे पसरुन ठेवायचा. 

(Image : Google)
(Image : Google)

२. त्यावर लिंबू सत्व म्हणजेच सायट्रीक अॅसिड घालायचे. ते नसेल तर लिंबाचा रस पिळला तरी चालतो. 

३. त्यावर कोकाकोला टाकून हे सगळे काही काळ तसेच ठेवायचे. याचा काही वेळात फेस तयार होतो.  

४. त्यानंतर टूथब्रशवर पेस्ट घ्यायची आणि हा करपलेला काळा झालेला भांड्याचा भाग त्याने घासायचा.

५. हे सगळे पदार्थ करपलेल्या भागावर लागतील असे पाहा, त्यामुळे काळेपणा निघण्यास मदत होईल. 

६. टुथब्रशने घासल्यानंतरही काही भाग स्वच्छ झाला नसेल तर घासणीने हलक्या हाताने घासल्यावर हे सगळे निघून जाण्यास मदत होते.

 

७. मग पाण्याने भांडी स्वच्छ धुवायची आणि वाळवायची. भांडी नव्यासारखी चमकतात. 

८. हीच भांड्याचा काळेपणा घालवण्याची ट्रिक अॅल्युनिमिअमच्या भांड्यांसाठीही वापरु शकतो. 

Web Title: Easy trick to clean burned steel utensils : Easy trick to clean dirty steel utensils, in 5 minutes the utensils will be shiny...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.