Lokmat Sakhi >Social Viral > काळेकुट्ट गॅस बर्नर साफ करण्याची १ सोपी ट्रिक, शेगडी दिसेल चकाचक- नव्यासारखी

काळेकुट्ट गॅस बर्नर साफ करण्याची १ सोपी ट्रिक, शेगडी दिसेल चकाचक- नव्यासारखी

Easy Trick to clean dirty Gas Burner : घाण अडकल्याने गॅसची फ्लेमही लहान होते आणि स्वयंपाकाला वेळ लागतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 02:42 PM2023-12-14T14:42:13+5:302023-12-14T14:44:30+5:30

Easy Trick to clean dirty Gas Burner : घाण अडकल्याने गॅसची फ्लेमही लहान होते आणि स्वयंपाकाला वेळ लागतो.

Easy Trick to clean dirty Gas Burner : 1 easy trick to clean Black gas burner, Grate will look shiny- like new | काळेकुट्ट गॅस बर्नर साफ करण्याची १ सोपी ट्रिक, शेगडी दिसेल चकाचक- नव्यासारखी

काळेकुट्ट गॅस बर्नर साफ करण्याची १ सोपी ट्रिक, शेगडी दिसेल चकाचक- नव्यासारखी

स्वयंपाकघरात  आपण केवळ स्वयंपाक करतो असे घरच्यांना वाटत असते. पण याठिकाणी साफसफाईचीही असंख्य कामे असतात. स्वयंपाकाचा ओटा, टाईल्स, ट्रॉलीज, सिंक, फ्रिज इथपासून ते  गॅस शेगडी, मिक्सर, ओव्हन या रोजच्या वापरातल्या गोष्टी सतत साफ कराव्या लागतात. सकाळी उठल्यापासून आपण ओटा, गॅस यांवर काही ना काही करत असतो. रोजच्या धावपळीत स्वयंपाक झाला की आपण की आपण ओटा, गॅसची शेगडी सगळं स्वच्छ करुन ठेवतो खरं. पण गॅसच्या बर्नरमध्ये अडकलेली घाण मात्र कित्येक दिवस तशीच राहते. त्यामुळे पितळ्याचे असलेले हे बर्नर काही दिवसांनी नकळत काळेकुट्ट दिसायला लागतात (Easy Trick to clean dirty Gas Burner) . 

कधी यावर दूध ओतू जातं तर कधी तेल सांडतं. कधी थेट बर्नरवर फुलके भाजल्याने किंवा वांगे भाजल्याने त्याचे कणही त्यात अडकतात त्यामुळे त्याचा मूळ रंग जाऊन हा बर्नर काळा दिसायला लागतो. इतकेच नाही तर त्यात घाण अडकल्याने गॅसची फ्लेमही लहान होते आणि स्वयंपाकाला वेळ लागतो. अशावेळी हा काळा झालेला बर्नर साफ तर करायला हवा हे कळतं पण त्यासाठी सोपा उपाय काय हे आपल्याला माहित असतंच असं नाही. आज आपण गॅस बर्नर साफ करण्याची अतिशय सोपी अशी ट्रिक पाहणार आहोत. ज्यामुळे अगदी ५ मिनीटांत हा बर्नर नव्यासारखा चकचकीत होतो...

(Image : Google)
(Image : Google)

१. एका बाऊलमध्ये बर्नर ठेवून त्यावर उकळतं पाणी ओतायचं. 

२. त्यावर लिंबाचा रस पिळायचा आणि इनोचे १ पाकीट घालायचे.

३. साधारण २ तास हे सगळे असेच पाण्यात भिजवून ठेवायचे.

४. त्यानंतर खराब झालेल्या टुथब्रशने हा  बर्नर चांगला घासायचा.

५. अगदी २ मिनीटे घासल्यानंतर हा बर्नर मस्त स्वच्छ झालेला दिसतो. 

६. गरम पाणी, लिंबू आणि इनो यांची प्रक्रिया झाल्याने हा धातू चमकण्यास मदत होते. 

७. महिन्यातून एकदा जरी हा उपाय केला तरी काळे झालेले बर्नर स्वच्छ दिसण्यास मदत होते. 
 

Web Title: Easy Trick to clean dirty Gas Burner : 1 easy trick to clean Black gas burner, Grate will look shiny- like new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.