Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरचे कळकट्ट झालेले भांडे स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, भांडे चमकेल नव्यासारखे, फार मेहनत न करता..

मिक्सरचे कळकट्ट झालेले भांडे स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, भांडे चमकेल नव्यासारखे, फार मेहनत न करता..

easy trick to clean mixer pot at home : हाताशी मिक्सर असला की आपली कामं अगदी झटपट होतात, पण तो नीट स्वच्छही असायला हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 10:21 AM2024-10-27T10:21:05+5:302024-10-28T18:10:08+5:30

easy trick to clean mixer pot at home : हाताशी मिक्सर असला की आपली कामं अगदी झटपट होतात, पण तो नीट स्वच्छही असायला हवा.

easy trick to clean mixer pot at home : Easy trick to clean the stuck mixer bowl, the bowl will shine like new... | मिक्सरचे कळकट्ट झालेले भांडे स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, भांडे चमकेल नव्यासारखे, फार मेहनत न करता..

मिक्सरचे कळकट्ट झालेले भांडे स्वच्छ करण्याची १ सोपी ट्रिक, भांडे चमकेल नव्यासारखे, फार मेहनत न करता..

दिवाळीच्या दिवसांत आपण नेहमीपेक्षा जास्त किचनमध्ये असतो. फराळाचे पदार्थ, येणार जाणार यामुळे किचनचा एरवीपेक्षा जास्तच वापर होतो. या काळात आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी किचनमधील सर्व गोष्टी जास्त प्रमाणात वापरतो. मिक्सर ही तर आपल्याला अगदी सतत लागणारी गोष्ट. कधी गोडाच्या पदार्थासाठी वेलची पूड करायची असो किंवा कधी अगदी साखरेची पिठीसाखर करायची असो हाताशी मिक्सर असला की आपली कामं अगदी झटपट होतात. भाजीचे वाटण असो किंवा एखादी चटणी पटकन मिक्सरमध्ये फिरवली की काम होते (How To clean Mixer pot at Home). 

घाईच्या वेळी स्वयंपाकाचे काम लवकर व्हावे यासाठी मिक्सर अतिशय उपयुक्त असून महिला सर्रास याचा वापर करतात.पण सततच्या मिक्सरच्या वापराने त्याचे भांडे खराब होऊन जाते. कधी या भांड्यातील ब्लेड जातो तर कधी झाकण तुटते. कधी भांडे खालच्या बाजुने कळकट्ट होऊन जाते. कितीही घासले तरी हे भांडे म्हणावे तसे स्वच्छ होतच नाही. आरोग्यासाठीही हे अजिबात चांगले नसते, अशावेळी मिक्सरचे भांडे स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत ...  


१. एका मोठ्या पातेल्यात पाणी चांगले गरम करायचे, त्यामध्ये १ चमचा खाण्याचा सोडा घालायचा. 

२. यामध्ये १ चमचा आपल्याकडे असेल तो डिटर्जंट घालायचा.

३. यात १ चमचा व्हिनेगर घालायचे आणि हे सगळे चांगले एकत्र करायचे. 

४. यामध्ये खराब झालेले मिक्सरचे भांडे ठेवायचे आणि १० ते १५ मिनीटे तसेच भिजत ठेवायचे.


५. त्यानंतर एका लहानशा ब्रशने हे भांडे घासायचे. यामुळे त्याला अडकलेली घाण निघून जाण्यास मदत होते. 

६. मग पुन्हा साध्या पाण्याने हे भांडे धुवायचे, यामुळे खराब झालेले भांडे एकदम नव्यासारखे स्वच्छ होण्यास मदत होते. 
 

Web Title: easy trick to clean mixer pot at home : Easy trick to clean the stuck mixer bowl, the bowl will shine like new...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.