गृहिणी असलेल्या महिलांचा जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये स्वयंपाक करण्यासोबतच इतर गोष्टी करण्यातही जातो. तुम्हालाही अनुभव आला असेल की, जेव्हा दूध गरम करण्यासाठी ठेवल्यावर इतर कामांमध्ये बिझी झाल्यास दूध उसू जातं आणि त्यामुळे दूध तर वाया जातच सोबतच गॅसही खराब होतो. अशात दूध उसू जाऊ नये म्हणून महिलांना बराच वेळ गॅस जवळच उभं रहावं लागतं. एकतर महिला गॅसजवळ उभ्या राहतात नाही तर आपल्या मुला-मुलींना उभं ठेवतात.
मात्र, दूध उसू जाण्याची ही समस्या दूर करण्यासाठी एक सोपा उपाय एका कंन्टेट क्रिएटरनं सांगितला आहे. शिप्रा रायनं एक व्हिडीओ शेअर करत एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकच्या मदतीनं दूध गरम करताना तुम्हाला गॅसजवळ बराच वेळ उभं राहण्याची गरज पडणार नाही आणि दुधही उसू जाणार नाही.
किचनमधील किंवा घरातील कामं सोप्या पद्धतीनं करण्याच्या ट्रिक सांगणारी शिप्रा रायनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात दूध उसू जाऊ नये यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. शिप्रानुसार, भांड्यात दूध टाकण्याऐवजी एक वाटी ठेवा. त्यानंतर दूध टाकून ते गरम करावं. असं केल्यास दूध उसू जाणार नाही. शिप्रानं दावा केला की, हा उपाय केल्यावर दुधही उसू जाणार नाही आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही.
इतर काही ट्रिक
दूध गरम करण्यासाठी छोट्या भांड्याऐवजी मोठ्या भांड्याचा वापर केला तर दूध बाहेर येण्याचं टेंशन कमी होईल.
भांड्याच्या वरच्या कोपऱ्यावर लोणी लावल्यानं उकडलेलं दूध बाहेर सांडत नाही. तसेच दूध उसू जाऊ नये म्हणून बराच वेळ गॅससमोर उभं राहण्याची गरज पडणार नाही.