पूर्वीच्या काळी घरोघरी पाटा वरवंटा पाहायला मिळायचा. स्वयंपाकघरात मिक्सर नसल्याने गावा-खेड्यात पाटा वरवंटा, जात्याचा उपयोग केला जायचा. (How to Use Pata Varvatana) आई-आज्जीच्या हाताच्या वाटलेल्या वाटणाची चवही वेगळी लागयाची. हल्ली ही संस्कृती लोप होताना दिसत आहे. परंतु, आजही काही घरात पाटा वरवंटा वापरला जातो. (Essential Hacks to Maintain Your Pata Varvatana)सध्या पाटा वरवंटाच्या अनेक नवीन पद्धती देखील निघाल्या आहेत. पारंपारिक स्वयंपाक बनवताना रोजच्या दिवशी वापरात येणाऱ्या वस्तूंमध्ये दगडी जातं, पाटा-वरवंटा, खलबत्ता यांचा वापर केला जातो. (Easy Tricks to Use a Pata Varvatana for Grinding Spices) परंतु, हा वापरण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नवीन पाटा वरवंटा आणला असेल किंवा टाकी देऊन आणला असेल तर या सोप्या ४ टिप्स लक्षात ठेवा. (Best Practices for Sharpening and Using a Pata Varvatana)
भाज्या खरेदी करताना या १० गोष्टी लक्षात ठेवा, किडक्या-खराब नको, आठवडाभर राहातील फ्रेश आणि ताज्या...
नवीन पाटा वरवंटा वापरण्यापूर्वी आणि त्याच्यावर पदार्थ चांगले दळावे यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हवा. नवीन घेतलेल्या पाटा वरवंटाला हवी तशी धार नसते. त्यामुळे वाटण वाटताना ते हवे तसे बारीक होत नाही. किंवा जाडसर राहाते. पाटा-वरवंटा वापरण्यापूर्वी तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ज्यामुळे त्यावर असणारी घाण साफ होईल.
टीप -१ पाटा वरवंटा वापरण्यापूर्वी त्यावर बटाट्याला मध्यभागी चिरून त्याला त्यावर घासा. चांगला घासल्यानंतर त्यानंतर पाण्याने पुन्हा धुवा. यामुळे पाटा व वरवंटा याला चमक येईल. तसेच धारदार होमण्.ास मदत ही होईल.
टीप - २पदार्थ वाटण्यापूर्वी तांदूळ पाटा वरवंट्यावर वाटून घ्या. अगदी बारीक पेस्ट होईपर्यंत वाटा. वाटून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे पाटा वरंवटाच्या पोत सुधारेल. मसाला वाटताना तो योग्य प्रकारे दळला जाईल.
टीप - ३ मेथीच्या भाज्यांची देठ संपूर्ण पाटा वरवंट्यावर चांगल्याप्रकारे वाटा. यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. पाटा वरवंटा आणखी चमकण्यास मदत होईल.
टीप - ४पाटा वरवंट्यावर तेल आणि हळदीचा लेप लावा. यामुळे त्याची चमक वाढेल. तसेच मसाला दळताना किंवा पुरण वाटताना अगदी व्यवस्थित रित्या वाटण तयार होईल. स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन विकत घेतलेल्या पाटा वरवंटा अगदी नव्यासारखा वाटणार नाही.