Join us  

आंघोळीच्या बादलीवर काळा थर जमा झाला? फक्त १ रुपयांत बादली करा स्वच्छ, वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 11:23 AM

Easy tricks to clean bathroom buckets cleaning tips : साबण, पाणी यामुळे बादलीच्या खालच्या भागालाही बरेचदा शेवाळे आल्यासारखे होते आणि राप चढतो.

रोजच्या रोज आंघोळ करणे हे आपल्या वैयक्तिक स्वच्छतेपैकी एक महत्त्वाचे काम असते. आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये जात असताना आपल्याला बाथरुम, बादली, मग, बसायची जागा, टाईल्स हे सगळे स्वच्छ असेल तर आपल्याला आंघोळीला फ्रेश वाटते. पण हेच सगळे खराब असेल तर आपल्याला नकोसे होते. आपण बाथरुम, टाईल्स हे सगळे रोज किंवा २ ते ३ दिवसांनी तरी साफ करतो पण बादल्या, मग यांच्याकडे काहीवेळा दुर्लक्ष होते. आतून ही बादली स्वच्छ राहते. पण बाहेरुन त्यावर कधी पांढरट तर कधी काळा थर जमा होतो. काहीवेळा हा थर हाताला लागेल इतका जास्त असतो. साबण, पाणी यामुळे बादलीच्या खालच्या भागालाही बरेचदा शेवाळे आल्यासारखे होते आणि राप चढतो (Easy tricks to clean bathroom buckets cleaning tips).  

बादली तर आपण आंघोळीला, कपडे धुवायला, हात पाय धुवायला अशा बऱ्याच गोष्टींसाठी वापरत असतो. त्यामुळे ती वेळच्या वेळी साफ असेल तर स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगले वाटते. पण ती कळकट्ट असेल तर मात्र आपल्याला आणि घरी पाहुणे आले तर त्यांनाही घाण वाटू शकते. आता या प्लास्टीकच्या बादल्या नेमक्या कशा साफ करायच्या याच्या २ सोप्या ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यामुळे बादल्या स्वच्छ-चकाचक होण्यास नक्कीच मदत होईल. 

(Image : Google)

१. शाम्पू

आपण केस धुतो त्या शाम्पूचा १ रुपयांचा सॅशे बादली साफ करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. बादलीवर साबणाचे पांढरे डाग, इतर घाण असेल तर ती जाण्यासाठी तर एका बाऊलमध्ये शाम्पू आणि थोडे टॉयलेट क्लिनर एकत्र करायचे. यात थोडे पाणी घालून त्या मिश्रणाने बादली घासायची. फक्त टॉयलेट क्लिनर जास्त स्ट्राँग असल्याने शाम्पूमुळे बादली नीट स्वच्छ होते. आठवड्यातून किमान एकदा हा उपाय केल्यास बादल्या चकचकीत राहण्यास मदत होते. 

(Image : Google)

२. बेकींग सोडा

साफसफाईसाठी सर्वात उत्तम असलेला बेकींग सोडा बादल्या साफ करण्यासाठीही फायदेशीर असतो. बादलीत २ ते ३ चमचे बेकिंग सोडा घालून त्यात २ मग कोमट पाणी घालायचे. मग बादली घासणीने घासायची. यामुळे बादलीची घाण निघून जाण्यास मदत होते. बादली बाहेरुन स्वच्छ करण्यासाठी बेकींग सोड्यामध्ये लिंबाचा रस घालून त्याची पेस्ट बादलीच्या बाहेरुन लावून ठेवायची आणि काही वेळाने घासून बादलीचा खराब थर साफ करायचा. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स