बाथरूममधील बादली आणि मग या वस्तूंचा वापर रोज होतो. पहिले लोकं स्टीलच्या बादल्या वापरत असत. त्यानंतर हळूहळू प्लास्टिकचा ट्रेण्ड सुरु झाला. आपल्या घरातील अनेक वस्तू या प्लास्टिकच्या असतात. प्रत्येक घरात प्लास्टिकच्या बादल्या, मग, टब हे असतेच. पण जस जसं वापर वाढतो, तस तसं बादल्यांवर हट्टी डाग येऊ लागतात. हे डाग घासूनही सहसा लवकर निघत नाही.
आपण दररोज बादल्या, मग घासत नाही. त्यामुळे पाण्याचे डाग किंवा साबणामुळे या बादल्यांवर डाग दिसू लागतात. जर हे डाग मेहनत न घेता, कमी वेळात काढायचे असतील तर, ३ गोष्टींचा वापर करून पाहा. या टिप्समुळे बादल्या आणि मग नव्यासारखे दिसतील, व चकाचक स्वच्छही होतील(Easy way to Clean Buckets or Mugs).
ब्लीच
ब्लीचच्या वापराने आपण घरातील अनेक गोष्टी स्वच्छ करू शकता. यामुळे कळकट, मेणचट झालेल्या बादल्याही काही मिनिटात स्वच्छ होतील. यासाठी एक ग्लास पाण्यात ब्लीच पावडर मिसळा. या पेस्टमध्ये कापड भिजवून बादल्यांवरील डाग घासून काढा. घासल्यानंतर बादली आणि मग स्वच्छ धुवून काढा. या ट्रिकमुळे काही मिनिटात बादली आणि मग स्वच्छ होतील. परंतु, ब्लीचचा वापर करताना हातात हातमोजे घालायला विसरू नका.
कपाटात जुन्या कपड्यांची गर्दी? किचनसाठी करा त्यांचा असा वापर, अनेक गोष्टी राहतील चकाचक
लिंबू
लिंबूमध्ये ऍसिटिक ऍसिड आढळते. ज्यामुळे प्लास्टिकच्या बादल्यांवरील डाग सहस निघून जातात. यासाठी बादल्यांवर काही मिनिटांसाठी लिंबाचा रस लावून ठेवा. अर्धा तासानंतर डिटर्जंटने बादल्या स्वच्छ घासून काढा. यामुळे मेहनत न घेता बादल्या स्वच्छ होतील.
देवघर कळकट-चिकट झाले? १ चमचा बेकिंग सोडा, देवघर उजळेल लख्ख
बेकिंग सोडा-व्हिनेगर
प्लास्टिकचा मग आणि बादल्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी आपण बेकिंग सोडा-व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत समप्रमाणात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घेऊन पेस्ट तयार करा, व ही पेस्ट बादल्यांवर लावून ठेवा. नंतर स्क्रबरने घासून पाण्याने स्वच्छ बादल्या धुवून काढा.