Join us  

फरशीवरचे गंजाचे डाग घालवण्याची १ सोपी ट्रिक, फरशी दिसेल नव्यासारखी चकचकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2024 10:17 AM

Easy Way to remove rust stain from flooring : गंजाचे डाग निघण्यासाठी करता येईल असा सोपा उपाय पाहणार आहोत.

घराची फरशी स्वच्छ असेल की घर एकदम चकचकीत दिसते. पण फरशीवर कचरा किंवा कसले डाग असतील तर मात्र घर अस्वच्छ दिसते. केर काढणे एकवेळ सोपे असते पण फरशी स्वच्छ पुसण्याला  ताकद लागते. काहीवेळा फरशीवर चिकट, तेलकट किंवा आणखी काही ना काही सांडते आणि फरशी एकदम अस्वच्छ दिसायला लागते. फरशीवरचे हे डाग वेळच्या वेळी निघाले तर ठिक नाहीतर फिनाईल किंवा एखादे स्पेशल सोल्यूशन टाकून आपल्याला हे डाग काढत बसावे लागतात (Easy Way to remove rust stain from flooring).

 फरशीवर पडलेले गंजाचे डाग तर अजिबात निघत नाहीत आणि मग पांढरी किंवा फिक्या रंगाची फरशी एकदम खराब दिसायला लागते. धातूच्या कुंड्या किंवा सिलेंडर यांच्याखाली पाण्यामुळे गंज जमा होतो आणि फरशीवर पिवळट केशरी डाग पडतात. हे डाग निघता निघत नाहीत आणि मग काय करावे ते आपल्याला कळत नाही. आज आपण असा गंजाचे डाग निघण्यासाठी करता येईल असा सोपा उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्याने डाग सहज निघण्यास मदत होते आणि फरशीही एकदम चकाचक दिसते. 

१. या गंजाच्या डागांवर डिटर्जंट पावडर घालायची.

२. त्यावर सगळीकडे लिंबाचा रस पिळायचा. 

३. त्यावर बेकींग सोडा घालायचा. 

४. साधारण १ ते २ तासांसाठी हे सगळे मिश्रण फरशीवर तसेच ठेवायचे. 

५. मग घासणीने हे सगळे थोडे जोर लावून घासायचे.

६. ओल्या फडक्याने फरशी पुसून घ्यायची. 

७. या सर्व पदार्थांमध्ये असणाऱ्या रासायनिक घटकांमुळे फरशीवरचे डाग अगदी सहज निघून जातात.

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स