Lokmat Sakhi >Social Viral > बाथरूमच्या टाइल्स पिवळ्या पडल्या? १० रुपये खर्च करा, उपाय असा की टाइल्स दिसतील स्वच्छ- नव्या कोऱ्या

बाथरूमच्या टाइल्स पिवळ्या पडल्या? १० रुपये खर्च करा, उपाय असा की टाइल्स दिसतील स्वच्छ- नव्या कोऱ्या

Easy Ways to Clean Bathroom Tiles : फक्त १० ते २० रूपयांमध्ये तुमचं काम अधिक सोपं होईल. (Easy Ways to Clean Bathroom Tile)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 06:47 PM2023-05-11T18:47:46+5:302023-05-12T13:34:37+5:30

Easy Ways to Clean Bathroom Tiles : फक्त १० ते २० रूपयांमध्ये तुमचं काम अधिक सोपं होईल. (Easy Ways to Clean Bathroom Tile)

Easy Ways to Clean Bathroom Tiles : Tips to Clean Bathroom Tiles & Floor with just 10 rupees | बाथरूमच्या टाइल्स पिवळ्या पडल्या? १० रुपये खर्च करा, उपाय असा की टाइल्स दिसतील स्वच्छ- नव्या कोऱ्या

बाथरूमच्या टाइल्स पिवळ्या पडल्या? १० रुपये खर्च करा, उपाय असा की टाइल्स दिसतील स्वच्छ- नव्या कोऱ्या

बाथरूम हा घरातील सगळ्यात अस्वच्छ भाग असतो. साफ सफाईकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर बाथरूमच्या टाईल्सवर पिवळट, काळे डाग पडतात. (Tips to Clean Bathroom Tiles & Floor  with just 10 rupees) डिटर्जंट पावडरनं कितीही घासलं तरीही हे डा निघत नाहीत. बाजारातून टॉयलेट क्लिनर आणूनही टॉयलेट, बाथरूम पूर्णपणे स्वच्छ होत नाही. काही सोपे किचन हॅक्स तुम्हाला बाथरूमची साफसफाई करण्यात मदत करू शकतात. फक्त १० ते २० रूपयांमध्ये तुमचं काम अधिक सोपं होईल. (Easy Ways to Clean Bathroom Tile)

बाथरूम टाईल्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

बाथरूम टाईल्स स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी लिंबाची सालं घ्या. लिंबाची सालं पाणी आणि मिठासह मिक्सरला फिरवून घ्या. हे मिश्रण एका बॉटलमध्ये भरून ठेवा. यात २ ते ३ चमचे हार्पीक घाला.  हे मिश्रण हाताला लागणार नाही याची काळजी घ्या. हातात घालण्याआधी ग्लोव्हज घाला.

या मिश्रणात थोडं पाणी मिसळा  आणि बाथरूमच्या अशा कोपऱ्यावर घाला जिथे घाणं जमा झाली आहे.  कमीत कमी ३० ते ३५ मिनिटं बाथरूममध्ये हे असेच राहू द्या. त्यानंतर पाणी घालून स्क्रबरच्या साहाय्यानं घालून काढा. हा हॅक तुमची मेहनत अर्धी करण्यास मदत करतेल. याशिवाय लिंबाचा चांगला सुगंधही येईल.

व्हिनेगर

तुमच्या घरी पांढरे व्हिनेगर असेल तर ते टॉयलेट पॉटमध्ये ओता आणि रात्रभर सोडा. किमान दोन कप व्हाईट व्हिनेगर वापरा. कोका-कोलासुद्धा व्हिनेगरप्रमाणेच काम करू शकते. पण  ते 1 तासापेक्षा जास्त काळ सोडू नका. फक्त पॉटचे डाग काढून टाका.

डिस्प्रिन

डिस्प्रिन सारखी पाण्यात विरघळणारी औषधे बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. तुम्हाला फक्त सॅलिसिलिक अॅसिड असलेली कोणतीही टॅब्लेट पाण्यात विरघळवून घ्यायची आहे आणि थोडा वेळ टाइल्सवर ठेवावी लागेल. त्यानंतर नॉर्मल फिनाईल किंवा कोणत्याही प्रकारचे टॉयलेट क्लीनर घाला आणि टाइल्सवर सोडा. साधारणपणे 20 मिनिटांनी स्क्रब करा. ही पद्धत बाथरूमच्या मळलेल्या फरशांवरील मीठ आणि पाण्याचे डाग सहजपणे काढून टाकेल.
 

Web Title: Easy Ways to Clean Bathroom Tiles : Tips to Clean Bathroom Tiles & Floor with just 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.