Lokmat Sakhi >Social Viral > किचनच्या टाइल्स मेणचट - कळकट झाल्या? पाण्यात मिसळा 'ही' पांढरी पावडर; टाईल्स चमकतील चटकन

किचनच्या टाइल्स मेणचट - कळकट झाल्या? पाण्यात मिसळा 'ही' पांढरी पावडर; टाईल्स चमकतील चटकन

Easy Ways to Clean Kitchen Tiles; know how to use baking soda for this : ५ रुपयाच्या 'या' पांढऱ्या पावडरची पाहा कमाल; मिनिटात किचन टाईल्स स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 12:56 PM2024-09-17T12:56:31+5:302024-09-17T12:58:35+5:30

Easy Ways to Clean Kitchen Tiles; know how to use baking soda for this : ५ रुपयाच्या 'या' पांढऱ्या पावडरची पाहा कमाल; मिनिटात किचन टाईल्स स्वच्छ

Easy Ways to Clean Kitchen Tiles; know how to use baking soda for this | किचनच्या टाइल्स मेणचट - कळकट झाल्या? पाण्यात मिसळा 'ही' पांढरी पावडर; टाईल्स चमकतील चटकन

किचनच्या टाइल्स मेणचट - कळकट झाल्या? पाण्यात मिसळा 'ही' पांढरी पावडर; टाईल्स चमकतील चटकन

आपलं किचन कायम चमकदार दिसावं असं प्रत्येकाला वाटतं (Cleaning Tips). पण नियमित किचन साफ करणं सर्वांना जमेल असे नाही. धकाधकीच्या जीवनात किचन साफ करायला वेळ मिळत नाही (Kitchen Tips). बरेच दिवस किचन साफ न केल्यामुळे किचन अधिक कळकट आणि खराब दिसू लागते. किचन साफ करणे गरजेचं आहे.

किचन कट्टा आपण नियमित साफ करतो. पण किचन टाईल्स दररोज साफ न केल्यामुळे मेणचट आणि कळकट होतात. कारण किचन टाईल्स आपण नियमित साफ करू शकत नाही. फोडणीचे मेणचट डाग काढणं खूप मेहनतीचं काम. जर टाईल्स स्वच्छ करणं कठीण आणि किचकट काम वाटत असेल तर, बेकिंग सोड्याचा उपाय करून पाहा. मिनिटात टाईल्स स्वच्छ होतील(Easy Ways to Clean Kitchen Tiles; know how to use baking soda for this).

स्वयंपाकघरातील टाईल्स स्वच्छ करण्यासाठी टिप्स

विकतची प्रिझर्वेटिव्ह असलेली आलं - लसूण पेस्ट कशाला वापरता? घरी करा पेस्ट ; टिकेल महिनाभर

- बेकिंग सोडा फक्त पदार्थात वापरण्यात येत नसून, किचनच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठीही आपण याचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा घ्या. त्यात पाणी मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट टाईल्सवर लावा. काही वेळानंतर टाईल्स स्कब्ररने घासून स्वच्छ करा. काही वेळाने पाण्याने टाईल्स स्वच्छ करा.

अंगदुखी - शरीराच्या दुर्गंधीने त्रस्त? अंघोळीच्या पाण्यात मिसळा चमचाभर ' ही ' गोष्ट; राहाल दिवसभर फ्रेश

- किचन टाईल्स स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचाही वापर करू शकता. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि व्हिनेगर घालून मिक्स करा. तयार पाणी टाईल्सवर शिंपडा. काही वेळाने वायपरने किंवा स्क्रबरने टाईल्स घासून स्वच्छ करा. या टिप्सच्या मदतीने टाईल्स काही वेळात चमकतील.

- साबणाच्या पाण्यानेही टाईल्स चमकतील. यासाठी एका छोट्या बादलीमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात साबणाची पावडर घालून मिक्स करा. या पाण्यात कापड बुडवून टाईल्स पुसून घ्या. यामुळे काही मिनिटात चिकट - मेणचट झालेले टाईल्स स्वच्छ होतील.  

Web Title: Easy Ways to Clean Kitchen Tiles; know how to use baking soda for this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.