Lokmat Sakhi >Social Viral > Easy Ways to Clean Kitchen Tiles : २ मिनिटात स्वच्छ होतील किचनच्या मळलेल्या, काळपट टाईल्स; ६ टिप्स, किचन दिसेल नवं कोरं

Easy Ways to Clean Kitchen Tiles : २ मिनिटात स्वच्छ होतील किचनच्या मळलेल्या, काळपट टाईल्स; ६ टिप्स, किचन दिसेल नवं कोरं

Easy Ways to Clean Kitchen Tiles : स्वयंपाकघरातील टाइल्स ठराविक अंतराने स्वच्छ केल्या पाहिजेत. टाईल्स नियमितरित्या पुसण्याची सवय ठेवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:33 PM2022-12-11T17:33:53+5:302022-12-11T17:50:33+5:30

Easy Ways to Clean Kitchen Tiles : स्वयंपाकघरातील टाइल्स ठराविक अंतराने स्वच्छ केल्या पाहिजेत. टाईल्स नियमितरित्या पुसण्याची सवय ठेवा.

Easy Ways to Clean Kitchen Tiles : What home remedy can I use to clean kitchen tiles | Easy Ways to Clean Kitchen Tiles : २ मिनिटात स्वच्छ होतील किचनच्या मळलेल्या, काळपट टाईल्स; ६ टिप्स, किचन दिसेल नवं कोरं

Easy Ways to Clean Kitchen Tiles : २ मिनिटात स्वच्छ होतील किचनच्या मळलेल्या, काळपट टाईल्स; ६ टिप्स, किचन दिसेल नवं कोरं

स्वयंपाकघर कितीही आवरलं तरीही परत तसाच पसारा होतो किंवा टाईल्सवर माती, धूळ चिकटते. घराच्या इतर भागांप्रमाणेच  किचनचीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. (Kitchen Tips) स्वयंपाकघरात घाण,  डाग, विशेषत: फरशी आणि भिंतींवर साचतात. कधी कधी  त्याचा वास येऊ लागतो. 

म्हणूनच स्वयंपाकघरातील फरशा स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत, ज्याद्वारे तुम्ही स्वयंपाकघर स्वच्छ करू शकता. पण एकही पैसा खर्च न करताही तुम्ही स्वयंपाकघर उजळून टाकू शकता. घरगुती उपाय तुम्हाला किचन स्वच्छ ठेवण्यास काही घरगुती उपाय तुम्हाला मदत  करतील. (Easy Ways to Clean Kitchen Tiles)

किचन फ्लोअर टाईल्स कसे स्वच्छ कराल

१) स्वयंपाकघरातील टाइल्स ठराविक अंतराने स्वच्छ केल्या पाहिजेत. टाईल्स नियमितरित्या पुसण्याची सवय ठेवा.

२) डाग जास्त काळ डाग टिकू नये असे वाटत असेल तर ते नियमितपणे साफ करत राहा.

३) जंतू आणि डागांपासून मुक्त होण्यासाठी, स्वच्छ कापड जंतुनाशकामध्ये भिजवून फरशा स्वच्छ करा.

४) बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट टाइल्सवर लावा आणि 30 मिनिटे राहू द्या आणि कोरडे होण्याची वाट पाहा. त्यानंतर कोमट पाण्याने आणि कपड्याने डाग स्वच्छ करा. 

५) जर जास्त हट्टी डाग असतील तर ग्रॉउट क्लिनर वापरा. पण त्यावर लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.

६) बेकिंग सोडा आणि लिंबू मिसळून तुम्ही पेस्ट तयार करू  शकता. ही पेस्ट टाईल्सना लावल्यानंतर स्वच्छ कापडानं टाईल्स पुसून घ्या. 

Web Title: Easy Ways to Clean Kitchen Tiles : What home remedy can I use to clean kitchen tiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.