फळे आणि भाज्या (Vegetable Peeling) सोलणे कधी कधी कंटाळवाणे आणि अवघड वाटते. लसूण, बटाटे आणि टोमॅटो सोलताना खूप वेळ जातो आणि हे काम किचकट वाटते (Cooking Tips). शिवाय ऐनवेळी हे काम लवकर आटोपत नाही. या वेळखाऊ आणि किचकट कामामुळे स्वयंपाकाचा वेळ वाढत जातो. जर आपल्याला कमी वेळात लसूण, बटाटे आणि टोमॅटो सोलायचे असतील तर, या काही खास पीलिंग हॅक्सचा वापर करून पाहा (Kitchen Tips and Tricks).
पीलिंग हॅक्समुळे भाज्या झटपट सोलण्यात मदत होईल. शिवाय स्वयंपाक करण्याचा वेळही वाचेल. जर आपल्याला झटपट स्वयंपाक आवरायचं असेल तर, या काही पीलिंग हॅक्स आपल्याला मदत करतील(Easy Ways To Cut And Peel Fruits And Vegetables).
लसूण सोलण्यासाठी ट्रिक
हात न लावता लसूण सोलण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात लसूण मोकळा करून घाला. या पाण्यात थोडं बेकिंग सोडा घाला. १० मिनिटांसाठी या पाण्यात लसूण भिजत ठेवा. पाण्यात भिजल्यामुळे लसणाच्या पाकळ्या मऊ होतील. नखांचा वापर करण्याऐवजी दोन बोटांच्यामध्ये पकडून चिमटीने आपण लसूण सोलू शकता.
मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर नक्की खा ४ पदार्थ, वेट लॉस होईल सुपरफास्ट; फिट राहायचं असेल तर..
बटाटे सोलण्याची नवी पद्धत
बटाटे सोलणे तसं वेळखाऊ काम. बऱ्याचदा उकडलेले बटाट्याचे साल लवकर निघत नाही. बटाटे उकडल्यानंतर आपण काही वेळ थंड जागेजवळ ठेवतो, नंतर बटाटे सोलतो. कारण गरम बटाटे सोलताना हाताला चटके बसू शकतात. यासाठी बटाटे उकडल्यानंतर एका बाऊलमध्ये बर्फाचे पाणी घ्या. त्यात उकडलेले बटाटे २ मिनिटांसाठी घालून ठेवा. यामुळे चटके न बसता काही मिनिटात किलोभर बटाटे सोलून निघतील.
उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात
टोमॅटो कसे सोलायचे?
या हॅकमुळे टोमॅटो सोलणे खूप सोपे होईल. एका सुरीने टोमॅटोच्या स्टेम भागावर 'X' हा निशाण तयार करा. नंतर एका बाऊलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. उकळत्या पाण्यात २ मिनिटांसाठी टोमॅटो ठेवा. २ मिनिटानंतर त्यातून टोमॅटो बाहेर काढून एका थंड पाण्याच्या बाऊलमध्ये ठेवा. टोमॅटो थंड झाल्यानंतर 'X' केलेल्या निशाणावरून अलगद साल खेचून काढा. या युक्तीचा वापर करून आपण भाजी सोलून काढू शकता.