कारमध्ये उंदीर शिरले की खूप महगात पडतं. कारण उंदरांनी कारच्या ज्या पार्टचं नुकसान केलेलं असतं ते पूर्ण बदलून घ्यावे लागतात आणि हे खूप खर्चिक ठरतं. (How to Get Rid of Rats that Live in Your Car) उंदीर कधी तार कापतात कर कधी मॅट्स कुरडतात. पावसाळ्यात या घटना जास्त प्रमाणात दिसून येतात. उंदरांना कारमध्ये शिरण्यापासून दूर ठेवण्यासाठी काही सोपे उपाय पाहूया. (How to remove rats from car)
१) हायड्रोजन पेरोक्साईड
तुम्ही अनेकदा हायड्रोजन पेरोक्साईडचं नाव ऐकलं असेल. याचाच वापर करून तुम्ही उंदरांना लांब ठेवू शकता. याच्या तीव्र वासानं उंदीर दूर पळतात. कापसाचे लहान बोळे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये बूडवून कारच्या अशा भागात ठेवा जिथे उंदीर येतात. याच्या वासानं उंदरं दूर पळतात. आठवड्यातून १ ते २ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.
२) कडुलिंबाचे तेल
कडवट पदार्थ किडे, उंदरं, मुंग्यांना अजिबात आवडत नाहीत. गाडीमध्ये शिरणाऱ्या उंदरांना दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचं तेल हा उत्तम पर्याय आहे. कारण हे तेल कडवट असते. उंदीर या तेलाच्या चवीमुळे आणि वासामुळे लांब राहतात. एका कापसाच्या बोळ्याला हे तेल लावून भिजवून ठेवा. तुम्ही याचा स्प्रे बनवूनही वापरू शकता.
३) काळी मिरी लसूण पावडर
उंदरांना गाडी शिरण्यापासून रोखण्यासाठी काळी मिरी आणि लसणाची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. यासाठी हे दोन्ही पदार्थ मिसळून एक लिक्विड तयार करा. ज्या ठिकाणाहून उंदीर गाडीत शिरतात तिथे ही पावडर शिंपडा. याच्या तीव्र वासानं उंदीर लांब राहतील.
४) पुदिन्याचं तेल
कडुलिंबाच्या तेलाप्रमाणेच पुदिन्याचं तेलसुद्धा उंदरांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पुदिन्याचे तेल उंदरांना दूर ठेवण्याचा एक चांगला पर्याय आहे. पुदिन्याची पेस्टही तुम्ही वापरू शकता. या तेलाचा स्प्रे बनवून किंवा कापसाचा बोळा बनवून ठिकठिकाणी ठेवा. काहीजण बोनेटमध्ये तंबाखूसुद्धा ठेवतात जेणेकरून उंदीरांमुळे होणारं नुकसान टळेल.