Lokmat Sakhi >Social Viral > पंखा खूप स्लो चालतोय-आवाजही येतो? ५ ट्रिक्स वापरा; पंख्याचा स्पीड वाढेल, हवेशीर राहील घर

पंखा खूप स्लो चालतोय-आवाजही येतो? ५ ट्रिक्स वापरा; पंख्याचा स्पीड वाढेल, हवेशीर राहील घर

Easy Ways To Increase the Fan Speed : स्पीड वाढवण्यासाठी नेहमीच मॅकेनिकला बोलावण्याची काही  गरज नाही. घरच्याघरी काही सिंपल ट्रिक्स वापरून तुम्ही पंख्याचा स्पीड वाढवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:46 PM2024-04-02T13:46:40+5:302024-04-02T13:59:31+5:30

Easy Ways To Increase the Fan Speed : स्पीड वाढवण्यासाठी नेहमीच मॅकेनिकला बोलावण्याची काही  गरज नाही. घरच्याघरी काही सिंपल ट्रिक्स वापरून तुम्ही पंख्याचा स्पीड वाढवू शकता. 

Easy Ways To Increase the Fan Speed : How To Increase Fan Speed How To Control Fan Sound | पंखा खूप स्लो चालतोय-आवाजही येतो? ५ ट्रिक्स वापरा; पंख्याचा स्पीड वाढेल, हवेशीर राहील घर

पंखा खूप स्लो चालतोय-आवाजही येतो? ५ ट्रिक्स वापरा; पंख्याचा स्पीड वाढेल, हवेशीर राहील घर

ऊन्हाळ्याच्या दिवसांत पंख्याशिवाय जमतच नाही. (Summer Tips) ज्या ठिकाणी लोक एसी, कुलरचा वापर करत नाहीत ज्या ठिकाणी  पंखा लावला जातो. तुम्ही सार्वजनिक स्थळांवर असाल किंवा घरात प्रत्येक ठिकाणी पंख्याचा वापर केला जातो. (Easy Ways To Increase the Fan Speed) रोज तासनतास पंखा वापरल्यामुळे पंख्याचा स्पीड कमी होतो तर कधी पंख्याचा आवाज येतो. (Home Hacks & Tips)

पंख्याचा स्पीड कमी झाल्यानंतर पंख्याचा जास्त आवाज येऊ लागतो. अशावेळी स्पीड वाढवण्यासाठी नेहमीच मॅकेनिकला बोलावण्याची काही  गरज नाही. घरच्याघरी काही सिंपल ट्रिक्स वापरून तुम्ही पंख्याचा स्पीड वाढवू शकता. (How to Increase The Speed Of Ceiling Fan)

1) पंख्याचे ब्लेड्स व्यवस्थित आहेत का ते तपासा

क्रॉम्पटनच्या रिपोर्टनुसार सिलिंग फॅनचे ब्लेड्स डॅमेज झाल्यामुळे फॅनमध्ये असंतुलन होते.  जर तुमचा पंखा जुना झाला असेल किंवा ब्लेड बदलण्याची आवश्यकता वाटत असेल तर शक्य तितक्या लवकर ब्लेड बदलून घ्या अन्यथा इजा होण्याची शक्यता असते. 

लादी पुसताना पाण्यात 'हा' पदार्थ घाला; घरात एकही डास-किटक येणार नाही; चमकदार दिसेल घर

2) बेअरींगमध्ये कचरा नसेल याची काळजी घ्या

सिलिंग फॅनमध्ये घाण, कचरा अडकला असेल तर तर  बॉल बेअरिंगमध्ये कचरा जमा होतो. ज्यामुळे पंख्याचा वेग कमी होतो.  बेअरींगची हालचालही कठीण होते.  जर तुमचा पंखा हाय स्पीड सिलिंग फॅन ऑईल पोर्टसह असेल तर उघडून त्यात  तेल घाला. बेअरींगमध्ये तेल घाला जेणेकरू पंख्याचा आवाज येणार नाही. 

3) कपॅसिटर बदलण्याची आवश्यकता असू शकते

पंख्याचा वेग कमी झाला असेल तर तुम्हाला पंख्याचा कपॅसिटर बदलण्याची आवश्यकता असू शकते. कारण यामुळे पंखा चांगला स्पीड पकडतो पंखा स्लो चालत असेल तर तर तुम्ही मार्केटमधून कपॅसिटर घेऊन बदलू शकता. नवीन कपॅसिटर लावल्यानंतर तुम्हाला दिसेल की पंख्याचा स्पीड वाढला आहे.कपॅसिटर लावण्यासाठी तुम्ही टेक्निशियनला बोलावू शकता किंवा स्वत:ही बदलू शकता. कपॅसिटर काढताना जुना कपॅसिटर काढाल तसाच नवीन लावा. 

4) पंखा स्वच्छ करायला विसरू नका

पंखा स्लो चालत असेल तर याची अनेक कारणं असू शकतात. पंख्याच्या ब्लेडवर घाण लागली असेल तरीही पंख्याचा वेग कमी होतो.  काही वेळानंतर सतत पंखा स्वच्छ करत राहा. पंख्याचे ब्लेड  ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या नंतर सुक्या कापडाने पुसा. पंख्याची साफ-सफाई  करताना स्विच बंद करायला विसरू नका.

थकवा येतो-कंबर दुखते? झिंकचा खजिना असलेले 5 पदार्थ खा, पन्नाशीनंतरही कोणी आजी म्हणणार नाही

5) वापर नसेल तर पंखा बंद कर

 रात्रभर पंखा सुरू असेल तर सकाळी थोडावेळ पंख्याला विश्रांती द्या. घरात एकापेक्षा जास्त फॅन असतील तर अदलून बदलून पंखा लावा. जास्तवेळ पंख्यावर ताण येणार नाही असे पाहा.  कारण नसताना पंखा सुरू असेल तर लाईटबीलातही वाढ होत जाते म्हणून काम झाल्यानंतर पंखा बंद करा. 

Web Title: Easy Ways To Increase the Fan Speed : How To Increase Fan Speed How To Control Fan Sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.