Lokmat Sakhi >Social Viral > पांढरा शर्ट - कुर्ता धुतल्यानंतर लगेच पिवळा पडतो? डिटर्जंटचा 'या' पद्धतीने वापर करा; चमक राहील तशीच

पांढरा शर्ट - कुर्ता धुतल्यानंतर लगेच पिवळा पडतो? डिटर्जंटचा 'या' पद्धतीने वापर करा; चमक राहील तशीच

Easy Ways to Remove Yellow Stains from the White Clothes : पांढरे कपडे धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2024 05:56 PM2024-06-02T17:56:44+5:302024-06-03T10:16:02+5:30

Easy Ways to Remove Yellow Stains from the White Clothes : पांढरे कपडे धुताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

Easy Ways to Remove Yellow Stains from the White Clothes | पांढरा शर्ट - कुर्ता धुतल्यानंतर लगेच पिवळा पडतो? डिटर्जंटचा 'या' पद्धतीने वापर करा; चमक राहील तशीच

पांढरा शर्ट - कुर्ता धुतल्यानंतर लगेच पिवळा पडतो? डिटर्जंटचा 'या' पद्धतीने वापर करा; चमक राहील तशीच

पांढरा रंग (White Colour) जवळपास सगळ्यांनाच आवडतो (White Clothes). पांढऱ्या रंगाचे कपडे सगळ्यांकडेच असतात. परंतु, पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्यानंतर त्यांना खूप सांभाळावं लागतं (Cleaning Tips). यासाठी अनेक जण कमी प्रमाणात पांढरे कपडे घालतात. किंवा परिधान करणं टाळतात (Social Viral).

पांढरे कपडे योग्यरित्या धुतल्यास अधिक वर्ष टिकतात. पण काही पांढऱ्या रंगाचे कपडे धुतल्यानंतर पिवळे पडतात. ज्यामुळे पांढऱ्या कपड्यांची चमक पूणर्पणे निघूनही जाते. पांढऱ्या कपड्यांची चमक आणि डाग दूर करण्यासाठी आपण काही गोष्टींचा वापर करून पाहू शकता. यामुळे पांढरे कपडे पिवळे होणार नाही. शिवाय पांढऱ्या कपड्यांची चमक तशीच राहील(Easy Ways to Remove Yellow Stains from the White Clothes).

पांढरे कपडे कसे धुवायचेत?

पांढरे कपडे धुण्यासाठी लागणारं साहित्य

बेकिंग सोडा

लिंबाचा रस

पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा ' असा ' करा उपयोग'; झाड बहरेल

व्हिनेगर

डिटर्जंट

अशा पद्धतीने पांढरे कपडे स्वच्छ धुवा

ICMR सांगते पाणी पिण्याची योग्य पद्धत; चुकीच्या पद्धतीने प्यायले तर हाडं होतील ठिसूळ आणि..

सर्वप्रथम, एका बादलीत कोमट पाणी घ्या. त्या पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा, अर्ध्या लिंबाचा रस आणि दोन चमचे व्हिनेगर घालून मिक्स करा. आता या पाण्यात पांढरे कपडे बुडवून ठेवा. रात्रभर या पाण्यात कपडे भिजत ठेवले तरी चालतील. रात्रभर कपडे त्यात भिजल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी वॉशिंग मशिनमधील डिटर्जंटच्या मदतीने किंवा हाताने स्वच्छ करा. शेवटी पाण्याने कपडे स्वच्छ धुवून घ्या.

पांढरे कपडे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर उन्हात वाळत घालण्याऐवजी, सावलीच्या ठिकाणी पसरवत ठेवा. असे केल्याने कपड्यांचे फॅब्रिक दीर्घकाळ नवीन राहते.

Web Title: Easy Ways to Remove Yellow Stains from the White Clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.