Join us  

Easy Ways to Unclog Your Drains : बाथरुमचा पाईप सतत तुंबतो? 5 ट्रिक्स; नेहमीचा त्रास होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 12:35 PM

Easy Ways to Unclog Your Drains : नाले तुंबण्याचे एक कारण म्हणजे केस. अनेकदा आंघोळीच्या वेळी केस तुटतात, जे नाल्यात अडकतात. त्यामुळे नाला ब्लॉक होतो.

बाथरूम साफ करणं कठीण काम आहे. पण अनेकदा साफसफाई करूनही  बाथरूमची नाली तुंबतात. याला कारण म्हणजे आपल्याकडून होणाऱ्या छोट्या-छोट्या चुका. (Quick and easy Cleaning Hacks) तुंबलेल्या नाल्यामुळे संपूर्ण बाथरूममध्ये पाणी भरू लागते. प्रत्येक वेळी या समस्येला स्वतःहून सामोरे जाणे कठीण आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाथरूमचा नाला कधीही ब्लॉक होऊ नये, तर त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Easy Ways to Unclog Your Drains) आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर नाला कधीच तुंबणार नाही. (Bathroom Blockage Removal Tips )

केस

नाले तुंबण्याचे एक कारण म्हणजे केस. अनेकदा आंघोळीच्या वेळी केस तुटतात, जे नाल्यात अडकतात. त्यामुळे नाला ब्लॉक होतो.  यासाठी आंघोळीनंतर लगेच केस डस्टबिनमध्ये टाकावेत. किंवा तुम्हाला हवे असल्यास, तुटलेले केस फेकण्यासाठी तुम्ही बाथरूममध्ये फॉइल किंवा बॉक्स ठेवू शकता. त्यामुळे नाल्यांच्या अडथळ्याची समस्या दूर होईल.

फक्त १० रूपयात स्वच्छ होईल बाथरूम, टॉयलेट; 5 हॅक्स वापरा, बाथरूम दिसेल नवं कोर, चकचकीत

शॅम्पूचे पाऊच फेकू नका

शॅम्पू पाऊच देखील सिंक बंद करू शकतात. म्हणूनच तुम्ही कधीही पाऊच नाल्यात टाकू नये. प्लास्टिकचा एक छोटासा तुकडा देखील समस्या निर्माण करू शकतो. म्हणूनच सॅशेऐवजी बॉटल शॅम्पू वापरावा. यामुळे आंघोळीनंतर शॅम्पूचे पाऊच फेकून द्यावे लागणार नाहीत. याशिवाय पाउच टाकण्यासाठी तुम्ही बाथरूममध्ये एक छोटा बॉक्स ठेवू शकता. ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक वापरानंतर वस्तू फेकून देऊ शकता.

झाकण उघडं न ठेवणं

नाल्याचे झाकण काही काळानंतर सैल होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे कोणतीही मोठी वस्तू नाल्यात सहज पडू शकते किंवा अडकू शकते. आणि मग बाथरूम तुंबते. झाकण सैल असल्याने नाल्यातही घाण साचते. ज्याची साफसफाई करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते किंवा प्लंबर बोलवावा लागतो. त्यामुळे झाकण सैल पडल्यास नवीन घ्या.

 ५ मिनिटात साफ होईल पंख्यावर जमा झालेली धूळ; 3 ट्रिक्स, चकचकीत दिसेल घाण झालेला पंखा

बाथरूम ब्लॉकेज हटवण्याचे सोपे उपाय

१) तुमचे बाथरूम कधीही तुंबू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर ते स्वच्छ ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. नाला साफ करण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा लागेल. नाला साफ करण्यासाठी त्यात बेकिंग सोडा घाला आणि नंतर वरून गरम पाणी घाला. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा.

२) बाथरूमचा नाला साफ करण्यासाठी, प्रथम त्यात उकळते गरम पाणी घाला. सुमारे 5 मिनिटे थांबा आणि नंतर नाल्यात थंड पाणी घाला. यानंतर लाकूड किंवा स्नेक ड्रेनर  साहाय्याने त्यात अडकलेले केस आणि कचरा इत्यादी काढा. आता क्लिनर नाल्यात टाका. काही वेळाने पुन्हा नाल्यात गरम पाणी टाका. याने तुमच्या बाथरुमचा नाला स्वच्छ होईल आणि कोणताही अडथळा होणार नाही.

३) आठवड्यातून किमान एकदा तरी अशा प्रकारे नाला साफ करा.  त्यामुळे ब्लॉकेजची समस्या कमी होते. कोणत्याही प्रकारचा कचरा नाल्यात जाऊ देऊ नका. नाला तुंबू नये म्हणून आठवड्यातून दोनदा त्यात गरम पाणी घाला. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया