Lokmat Sakhi >Social Viral > Use of Fruit Peels: फळं खा, सालं फेकू नका! उन्हाळ्यात थंडावा हवा तर करा 4 प्रकारे वापर

Use of Fruit Peels: फळं खा, सालं फेकू नका! उन्हाळ्यात थंडावा हवा तर करा 4 प्रकारे वापर

Summer Special: काही फळांची सालं (fruit peels) देखील अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे फळं खायची आणि सालं फेकायची असं किमान उन्हाळ्यात तरी करू नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 09:03 PM2022-04-18T21:03:26+5:302022-04-18T21:03:54+5:30

Summer Special: काही फळांची सालं (fruit peels) देखील अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे फळं खायची आणि सालं फेकायची असं किमान उन्हाळ्यात तरी करू नका.

Eat fruits, but don't throw away their peels, 4 uses of fruit peels specially in summer for cool down | Use of Fruit Peels: फळं खा, सालं फेकू नका! उन्हाळ्यात थंडावा हवा तर करा 4 प्रकारे वापर

Use of Fruit Peels: फळं खा, सालं फेकू नका! उन्हाळ्यात थंडावा हवा तर करा 4 प्रकारे वापर

Highlightsकोणत्या फळाचं साल कशा पद्धतीने वापरायचं, याची अचूक माहिती असणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी कमी (dehydration) होत जाते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून पाणीदार म्हणजेच पाण्याचं प्रमाण भरपूर असणारी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अशा प्रकारात येणारी टरबूज, खरबूज, काकडी अशी फळं आपण खातो आणि त्यांची सालं मात्र टाकून देतो. पण असं करणं चुकीचं आहे. कारण या फळांएवढीच त्यांची सालंही महत्त्वाची आहेत..(how to use fruit peels)

 

उन्हाळ्यात तळपायांची आग होणं. चेहरा, डोळे ओढल्यासारखे होणे, तळहातातून जणू उष्णता बाहेर टाकली जात आहे, असे वाटणे.... असे त्रास अनेक लोकांना होत असतात. शरीरातील उष्णता वाढली की असे त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच अशा पद्धतीचे त्रास कमी करण्यासाठी फळांची सालं अतिशय उपयुक्त ठरतात. म्हणूनच कोणत्या फळाचं साल कशा पद्धतीने वापरायचं, याची अचूक माहिती असणं गरजेचं आहे.

 

असा करा फळांच्या सालीचा वापर
१. उन्हाळ्यात सगळ्याच घरांमध्ये खाल्लं जाणारं एक मुख्य फळ म्हणजे टरबूज. टरबूज (water melon) खातो आणि त्याची जाडजुड सालं मात्र आपण टाकून देतो. पण या सालांमध्येही पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे शरीराची वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. टरबुजाचा गुलाबी भाग काढून घेतल्यानंतर त्याची पांढरट हिरवी सालं तळपायाखाली ठेवा. किंवा तळपायांवर घासा. अतिशय शांत, थंड आणि रिलॅक्स वाटेल.

 

२. काकडीची (cucumber) कोशिंबीर हा उन्हाळ्यातला आणखी एक आवडता पदार्थ. कोशिंबीर नाही केली तर नुसती काकडी तरी अनेक जण खातातचं. काकडीची सालं काढून टाकणार असाल तर ती सालं तुमच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर काही मिनिटे पसरवून ठेवा. थंड वाटेल.

 

३. टरबुजाप्रमाणे खरबुजमध्येही (musk melon) पाणी पातळी भरपूर असते. पण तुलनेने खरबुजाचं सालं अगदीच पातळ असतं. हे साल तळहातांवर घासा. उष्णतेमुळे अंगाची होणारी लाहीलाही कमी झाल्यासारखे वाटेल.
४. केळीची (banana) सालं देखील अतिशय गुणकारी असतात. ही सालं चेहऱ्यावर, तळपायावर, तळहातावर घासा. यामुळेही थंड, शांत वाटेल. 

 

Web Title: Eat fruits, but don't throw away their peels, 4 uses of fruit peels specially in summer for cool down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.