फळं भाज्यांचा आहारात समावेश करताना पहिला नियम म्हणजे पाण्यानं ती स्वच्छ धुवावीत. पण आंबा, कलिंगड, खरबूज ही फळं खातांना ती केवळ धुवून घेणंच महत्वाची असतात असं नाही तर ती काही वेळ पाण्यात भिजवणंही आवश्यक असतात. यामागे काही शास्त्रीय कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
Image: Google
1. आंबा, कलिंगड, खरबूज या फळांमध्ये असलेली उष्णता ही शरीराच्या क्रियेवर विशेषत: चयापचयाच्या क्रियेवर विपरित परिणाम करते. ही फळं पाण्यात भिजवल्यानं ही फळं खाल्ल्यानंतर डोकेदुखी, जुलाब, बध्दकोष्ठता असे दुष्परिणाम होणं टाळलं जातं.
2. आंब्यामध्ये फायटिक ॲसिड नावाचा नैसर्गिक रेणू असतो. हा रेणू काढून टाकण्यासाठी आंबा खाण्याआधी अर्धा तास पाण्यात भिजवणं आवश्यक असतं. तसेच आंब्यामध्ये उष्णताही जास्त असते. आंबा पाण्यात भिजवल्यानं आंब्याचं तापमान कमी होण्यास मदत होते. कलिंगड आणि खरबूजही याच कारणासाठी पाण्यात भिजवणं आवश्यक असतं.
Image: Google
3. फळं भिजवल्यामुळे त्यावरील कीटकनाशकांचे अवशेष जे धुतल्यानंतरही शिल्ल्क राहातात ते निघून जाण्यास मदत होते. या फळांवरील किटकनाशकं शरीरात गेल्यास श्वसनासंबंधी समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळेच तज्ज्ञ सांगतात केवळ आंबा, कलिंगड आणि खरबूजच नव्हे तर आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करता प्रत्येक फळं धुतल्यानंतर काही वेळ पाण्यत भिजवून ठेवणं आवश्यक आहे.