Lokmat Sakhi >Social Viral > Ecofriendly Holi: फक्त ३ गोष्टी वापरून घरच्याघरी तयार करा होळीचे रंग! त्वचा आणि आरोग्यासाठी सुरक्षित..

Ecofriendly Holi: फक्त ३ गोष्टी वापरून घरच्याघरी तयार करा होळीचे रंग! त्वचा आणि आरोग्यासाठी सुरक्षित..

How To Make Natural Colours For Holi: यंदाची रंगपंचमी साजरी करा स्वत:च्या हाताने तयार केलेले रंग लावून... घरच्याघरी रंग तयार करणं आहे अगदी सोपं.. अवघ्या ४ ते ५ तासांत इकोफ्रेंडली रंग (ecofriendly colours) तयार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 02:43 PM2022-03-15T14:43:34+5:302022-03-15T14:45:09+5:30

How To Make Natural Colours For Holi: यंदाची रंगपंचमी साजरी करा स्वत:च्या हाताने तयार केलेले रंग लावून... घरच्याघरी रंग तयार करणं आहे अगदी सोपं.. अवघ्या ४ ते ५ तासांत इकोफ्रेंडली रंग (ecofriendly colours) तयार....

Ecofriendly Holi: How to make eco-friendly holi colours at home? Simple home made method for making natural colours | Ecofriendly Holi: फक्त ३ गोष्टी वापरून घरच्याघरी तयार करा होळीचे रंग! त्वचा आणि आरोग्यासाठी सुरक्षित..

Ecofriendly Holi: फक्त ३ गोष्टी वापरून घरच्याघरी तयार करा होळीचे रंग! त्वचा आणि आरोग्यासाठी सुरक्षित..

Highlightsचला तर मग करून बघा हा प्रयोग आणि बनवा घरच्याघरीच तुम्हाला आवडतील तसे इकोफ्रेंडली रंग..

अवघ्या दोन- तीन दिवसांवर होळी आली आहे... रंगांची मुक्त उधळण करण्याचा हा उत्सव.. पर्यावरणाबाबतची जागरुकता वाढल्याने आजकाल इको फ्रेंडली रंग (ecofriendly colours at home) घेण्याकडे अनेकांचा कल आहे. पण नेमकं होतं असं की साध्या रंगापेक्षा इकोफ्रेंडली रंग अधिक महाग असतात. त्यामुळे साहजिकच डोक्यात पैशांची आकडेमोड सुरू होते आणि मग हिशोबात बसल्याने साधे रंग घेऊनच रंगपंचमी साजरी केली जाते.

 

पण साधे रंग खेळताना मनात कायम एक भीती असते की हे रंग आपल्या त्वचेसाठी, आरोग्यासाठी सुरक्षित असतील की नाही.. म्हणूनच तर असं संभ्रमात राहून आणि असुरक्षित भावनेने रंग खेळण्यापेक्षा घरच्याघरी तयार करा ना छान इकोफ्रेंडली रंग, ते ही अगदी स्वस्तात... तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच आढळून येणारे पदार्थ वापरून हे रंग तयार करता येतात. त्यामुळे हे रंग त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी १०० टक्के सुरक्षित असणार यात काहीच वाद नाही.. चला तर मग करून बघा हा प्रयोग आणि बनवा घरच्याघरीच तुम्हाला आवडतील तसे इकोफ्रेंडली रंग..

रंग तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
पाऊण कप पाणी, खाण्याचे रंग ५ ते ६ थेंब आणि अर्धा कप कॉर्न फ्लॉवर, प्लॅस्टिकचे कापड

 

रंग तयार करण्याची पद्धत..
(How to make eco-friendly holi colours at home)
- सगळ्यात आधी एक बाऊल घ्या.
- त्यामध्ये पाऊण कप पाणी व खाण्याचा तुमच्या आवडीचा रंग टाका. हे मिश्रण चांगले हलवून घ्या.
- आता यामध्ये एकेक चमचा करून कॉर्न फ्लॉवर टाका. सुरुवातीला एक चमचा टाका. त्यानंतर ते पाण्यात नीट कालवून घ्या, त्यानंतर थोडं थोडं टाका.
- जोपर्यंत बाऊलमधलं मिश्रण घट्ट होत नाही आणि ते कालवणं आपल्याला जड जात नाही, तोपर्यंत कॉर्नफ्लॉवर टाकत रहावे.
- यानंतर जेव्हा मिश्रण अगदी घट्ट होईल तेव्हा कॉर्नफ्लॉवर टाकणे थांबवा.


- आता एक प्लॅस्टिकची पिशवी उन्हात पसरून ठेवा आणि त्यावर आपले हे वाटीतले मिश्रण वाळत घाला. 
- ३ ते ४ तासात प्लॅस्टिकवरचे मिश्रण वाळून जाईल आणि त्याला भेगा- भेगा पडलेल्या दिसतील.
- हे मिश्रण आता उचलून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पावडर करून घ्या. 
- घरच्याघरी तयार झाला तुमचा इकोफ्रेंडली रंग.. 
- अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला आवडतील ते रंग बनवू शकता. 
- या मिश्रणात एखाद्या अत्तराचे तीन- चार थेंब टाकल्यास सुगंधित रंग तयार होतो. 

 

 

Video credit: Crafts and Kitchen

 

Web Title: Ecofriendly Holi: How to make eco-friendly holi colours at home? Simple home made method for making natural colours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.