२३ ऑगस्ट २०२३, ही तारीख समस्त भारतीयांनी आपल्या मनामध्ये सुवर्ण अक्षरांत कोरून घेतले आहे. या दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरले आहे. आणि ते यान म्हणजेच चंद्रयान - ३ हे आपल्या भारतीयांचे आहे हे विशेष. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ऐतिहासिक कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे. इस्रोवर संपूर्ण जग शुभेच्छा आणि कौतुकाचं वर्षाव करत आहे.
काही माणसांसाठी मात्र तो दिवस आयुष्यभराची खास आठवण सुंदर भेटही ठरला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरची ही गोष्ट. गोरखपूरच्या जिल्हा रुग्णालयात त्या सायंकाळी ७ मुलांचा जन्म झाला. तर आपल्या देशाला सलाम करत काहींच्या पालकांनी त्यांचं नावच चंद्रयान ठेवलं. तर काहींनी चंद्रावरुनच आपल्या मुलांची नावं ठेवली(Effect of Chandrayaan 3’s successful landing… Twins named ‘Chandrayaan and Chandni’ ).
लेकीला सहावीत गणितात मिळाले १५ पैकी शून्य मार्क; आई म्हणाली शाबास बाळा..
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, '' २३ ऑगस्टच्या सायंकाळी गोरखपूरच्या जिल्हा रुग्णालयात एका महिलेने गोड लेकीला जन्म दिला. पालकांनी तिचे नाव 'चांदनी' ठेवले. मुलीचे वडिल म्हणतात चंद्रयान- ३ ने जेव्हा सॉफ्ट लॅण्डिंग केलं, तेव्हा आमच्या मुलीने जन्म घेतला. त्यामुळे हा खास दिन स्मरणात राहावा म्हणून, आम्ही तिचे नाव 'चांदनी' ठेवले.
फोडण्यांच्या तेलानं-धुरानं किचनच्या खिडक्या चिकट-मेणचट झाल्या? ४ भन्नाट टिप्स- खिडक्या चमकतील चटकन
याच जिल्हा रुग्णालयात, एका दांपत्याला मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुलं झाली. त्यांनी मुलाचे नाव चंद्रयान तर मुलीचे नाव चांदनी ठेवण्याचं ठरवले आहे.