Join us  

घरातल्या टॉयलेट सीटवर काळे-पिवळे डाग पडले? ३ ट्रिक्स, स्वच्छ दिसेल टॉयलेट-दुर्गंध येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 2:54 PM

Effective Indian Toilet Cleaning Hacks (toilet kase clean karave) : ब्रश वापरल्यानंतर जर्म्स फ्री करायला विसरू नका. ब्रश यूज केल्यानंतर त्यावर डिसइन्फेक्टेंट शिंपडा.

आजकाल बऱ्याच ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट्सचा वापर होत असला तरी इंडियन टॉयलेट्स अनेक घरांमध्ये दिसून येतात. (Diwali Home Cleaning Tips) लोक या प्रकारच्या टॉयलेट्सना आऊट ऑफ ट्रेंड्स मानत असल तरी अनेक हेल्थ एक्सपर्ट्स याचा वापर करण्याचा सल्ला देतात कारण वेस्टर्न टॉयलेट्सच्या तुलनेत असे टॉयलेट्स वापरल्याने इन्फेक्शनचा धोका कमी असतो. (How to keep toilet bowl clean)

याशिवाय पोट साफ होण्यासही मदत होते. ब्रश वापरल्यानंतर जर्म्स फ्री करायला विसरू नका. ब्रश यूज केल्यानंतर त्यावर डिसइन्फेक्टेंट शिंपडा. २ मिनिटांनंतर स्वच्छ गरम पाण्याने धुवा आणि वॉशरूमध्ये ठेवा. (How to clean Indian Toilet Seat) जर तुमच्याही घरात इंडियन टॉयलेट असेल आणि त्यावर काळे-पिवळे डाग पडले असतील तर  नवीन काही उपाय करून तुम्ही हे डाग सहज स्वच्छ करू शकता. (Toilet cleaning tips) जेणेकरून घरात कोणीही पाहूणे आल्यानंतर तुम्हाला खराब वाटणार नाही. काही मिनिटांत तुम्ही टॉयलेट सिट चमकवू शकता. टॉयलेट स्वच्छ करण्याचा ब्रश ६ महिन्यातून एकदा बदलायला हवा. (How to Clean a Toilet Like a Pro)

बेकींग सोडा

किचनमध्ये वापरात येणाऱ्या बेकींग सोड्यात एंटी बॅक्टेरिअल आणि एंटीसेप्टीक गुण असतात. ज्याचा वापर दीर्घकाळ साफसफाईच्या कामांमध्ये केला जातो. जर टॉयलेट सीट जास्त घाणेरडे दिसून येत असेल तर तुम्ही बेकींग सोड्याची पेस्ट बनवून त्यात घालू शकता. १० ते १५ मिनिटं तसंच ठेवून ब्रशने घासून घ्या या उपायाने  टॉयलेट पांढरेशुभ्र दिसेल आणि मळ निघून जाईल.

घराच्या बाल्कनीत लावा सुंदर क्लाईंबिग प्लांट्स; खर्च १०० रूपयांपेक्षा कमी, वेलींनी सजेल घर

व्हिनेगर

व्हिनेगरचा वापर करून तुम्ही डाग-काढून टाकू शकता. यामुळे घाणेरडं टॉयलेट सिट अगदी चमकदार स्वच्छ दिसेल. हे एखाद्या क्लिनरप्रमाणे काम करते. सगळ्यात आधी पाण्यात योग्य प्रमाणात मिसळा आणि टॉयलेट सीटवर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यात थोडं डिटर्जेंट घालून सीट ब्रशच्या साहाय्याने रगडून स्वच्छ करा. 

बोरीक एसिड

या उपयाने टॉयलेट स्वच्छ होण्याबरोबच सॅनिटाईज होण्यासही मदत होईल. बेकिंग सोडा एखाद्या नॅचुरल क्लिनरप्रमाणे काम करतो. व्हिनेगर किंवा पाण्यात  मिसळून तुम्ही टॉयलेट सिट क्लिन करू शकता. याच पद्धतीने तुम्ही वेस्टर्न टॉयलेट्सही स्वच्छ करू शकता. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियास्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडी