किचनमधील स्टीलचे सिंक ही स्वच्छतेची एकमेव अशी महत्वाची जागा असते. स्टीलच्या या किचन सिंकमध्ये आपण भाजी धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंतची अशी अनेक स्वच्छतेची काम करतो. बरेचदा सिंकमध्ये अशी काम केल्याने आपले किचन सिंक खराब होते. याचबरोबर, असे किचन सिंक जर वेळीच स्वच्छ केले नाही तर त्यात घाण साचून ते खराब दिसू लागते, सोबतच यातून कुबट दुर्गंधी देखील येऊ लागते. असे किचन सिंक स्वच्छ करणे म्हणजे फार कठीण काम असते(Effective Tips To Clean Sticky Steel Sink With Onion & Potato Peels).
किचन सिंकमधील तेलकट - चिकट डाग काढणे तर त्याहून कठीण काम असते. असे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी आपण ते वारंवार घासतो किंवा स्वच्छ करतो. यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या महागड्या साबण, डिटर्जंट किस्वा फिनाईल, लिक्विड सोपंचा वापर करतो. परंतु किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी फारशी मेहेनत न घेता देखील आपण अगदी सोप्या पद्धतीने किचन सिंक स्वच्छ करु शकतो. किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लिनर्सचा वापर करण्यापेक्षा आपण चक्क कचरा समजून फेकून देतो त्या कांदा - बटाट्याच्या सालींचा वापर करु शकतो. किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी कांदा - बटाट्याच्या सालींचा वापर कसा करायचा ते पाहूयात( Hacks To Use Onion Potato Peels For Cleaning).
किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी कांदा - बटाट्याच्या सालींचा वापर...
१. कांदा - बटाट्याच्या सालीं :- किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी कांदा - बटाट्याच्या सालींचा वापर करु शकतो. शक्यतो, आपण कांदा - बटाट्याच्या सालीं कचरा समजून फेकून देतो परंतु या सालींमध्ये नैसर्गिक अॅसिड आणि स्टार्चचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे या सालींचा वापर आपण किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी करु शकतो. यासाठी कांदा - बटाट्याच्या सालीं एकत्रित जमवून स्टोअर करून ठेवाव्यात. त्यानंतर या साली किचन सिंकमध्ये ठेवून घासून घ्याव्यात, मग पाण्याने सिंक स्वच्छ धुवून घ्यावे. आपले किचन सिंक अगदी नव्यासारखे चमकू लागेल.
कुकर नेहमी घासता, पण ' या ' ३ जागा अस्वच्छ राहिल्या तर आजार नक्की, कुकर ' असा ' करा स्वच्छ...
२. कांद्याची साल आणि लिंबाचा रस :- किचनमधील स्टीलचे सिंक साफ करण्यासाठी कांद्याच्या सालीचे लहान तुकडे करून घ्या. हे तुकडे सिंकमध्ये टाका. त्यानंतर या सालींवर लिंबाचा रस पिळून घ्यावा. आता लिंबाचा रस आणि कांद्याच्या सालीने एकत्रित सिंक घासून घ्यावे. त्यानंतर २ ते ३ मिनिटे हे असेच ठेवावे. मग कोमट पाण्याने सिंक धुवून घ्यावे.
३. बटाट्याची साल आणि बेकिंग सोडा :- सगळ्यात आधी स्टीलच्या सिंकमध्ये बेकिंग सोडा भुरभुरवून घ्यावा. त्यानंतर सॉफ्ट स्क्रबच्या मदतीने सिंक घासून घ्यावे. त्यानंतर बटाटाची सालं या सिंकवर ठेवून घासा. किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्यासोबत बटाट्याची साल वापरणे हा उपाय फारच फायदेशीर ठरु शकतो.
डोअर मॅट सारखी दुमडते, ५ ट्रिक्स- कोपरे सरळ होऊन मॅट दिसेल नव्यासारखी कडक...