Lokmat Sakhi >Social Viral > घरात पालीं, झुरळांचा सुळसुळाट झालाय? १ सोपा उपाय, पाली-किटक आसपासही दिसणार नाहीत

घरात पालीं, झुरळांचा सुळसुळाट झालाय? १ सोपा उपाय, पाली-किटक आसपासही दिसणार नाहीत

Effective Ways That Show How to Get Rid of Lizards : पालींना दूर पळवण्यासाठी कांदा आणि लसणाच्या पाकळ्या दारे आणि खिडक्यांजवळ ठेवा.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 04:02 PM2023-08-01T16:02:14+5:302023-08-01T20:35:29+5:30

Effective Ways That Show How to Get Rid of Lizards : पालींना दूर पळवण्यासाठी कांदा आणि लसणाच्या पाकळ्या दारे आणि खिडक्यांजवळ ठेवा.

Effective Ways That Show How to Get Rid of Lizards : Simple Tips to Remove Lizards From Your Home | घरात पालीं, झुरळांचा सुळसुळाट झालाय? १ सोपा उपाय, पाली-किटक आसपासही दिसणार नाहीत

घरात पालीं, झुरळांचा सुळसुळाट झालाय? १ सोपा उपाय, पाली-किटक आसपासही दिसणार नाहीत

पावसाळ्याच्या दिवसात घरात किटकांची संख्या वाढते. अशात पालींचा वावरही वाढतो. रात्री भांडी घासली नाही  किंवा केर व्यवस्थित काढला नसेल तर लगेच घरभर  झुरळं पसरतात. (How to get rid of lizards at home) घरात अन्नाचे कण पडले असतील तरीही झुरळं वाढतात. किटक कमी करण्यासाठी स्प्रे वापरायचा नसल्यास काही सोपे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Effective Ways That Show How to Get Rid of Lizards)

सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात  ३ ते ४ लिंबू चिरून घाला त्यात डांबराच्या गोळ्या आणि  एक ग्लास पाणी घाला. याची पेस्ट बनवल्यानंतर गाळून एका डब्यात काढून घ्या.  त्यात १ चमचा बेकिंग सोडा, एक चमचा डिटर्जेंट आणि अर्धा ग्लास पाणी घाला. या लिक्वीडमध्ये कापसाचा बोळा बुडवून हे कापसाचे तुकडे झुरळं, पाणी येत असलेल्या ठिकाणी ठेवा.  याच्या तीव्र वासानं मुंग्या, किटक दूर निघून जातील हे लिक्वीड एक स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही ठिकठिकाणी याची फवारणी करू शकता यामुळे किटक दूर होतील आणि मुंग्याही येणार नाहीत. (How to Get Rid of Lizards in the House)

पालींना दूर पळवण्याचे उपाय

लाल मिरची

लाल मिरची आणि काळी मिरी योग्य प्रमाण घेऊन पाण्यात मिसळा. त्यानंतर घराच्या कानाकोपऱ्यात, खिडक्या, दरवाज्यांवर लाल मिरच्याच्या पाण्याचा स्प्रे करा. यामुळे पाली दूर पळतील. ही पावडर तुमच्या  त्वचेवर आणि केसांना लागणार नाही याची काळजी घ्या.

कॉफी पावडर

पालींना पळवण्यासाठी कॉफी पावडर उपयोगी ठरते. सगळ्यात आधी कॉफी पावडरमध्ये तंबाखू मिसळा त्यानंतर याच्या लहान लहान गोळ्या बनवा.  ज्या ठिकाणी पालींचा वावर असतो त्या ठिकाणी ही पावडर शिंपडा. कॉफी आणि तंबाखूच्या तीव्र वासाने पाली दूर राहतील.

थंड पाणी

थंड पाणी देखील पाली दूर करण्यास मदत करू शकते. पाली दिसल्यावर त्यावर थंड पाणी शिंपडा. यामुळे पाली घराबाहेर पळतील.

कांदा- लसूण

पालींना दूर पळवण्यासाठी कांदा आणि लसणाच्या पाकळ्या दारे आणि खिडक्यांजवळ ठेवा. तुम्हाला दिसेल की पाली कांदा-लसणाचा तिखट वास सहन करू शकणार नाही आणि लगेच पळून जातील.

काळीमिरी

काळी मिरी पावडर पाण्यात मिसळा आणि ज्या ठिकाणी पाली जास्त येतात त्या ठिकाणी हे पाणी शिंपडा. या उपायानं पाली घरापासून लांब राहतील.

Web Title: Effective Ways That Show How to Get Rid of Lizards : Simple Tips to Remove Lizards From Your Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.