Join us

पावसाळ्यात घरभर माश्या? 4 टिप्स, माश्यांचा उपद्रव होईल चटकन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 16:02 IST

Effective Ways to Get Rid of those Buzzing Houseflies! पावसाळा सुरु होताच घरात माश्या येतात? ४ टिप्स, माश्या होतील गायब

पावसाळा सुरु झाला की, घरात अनेक किटकांचा वावर सुरु होतो. ज्यात माश्यांचा देखील समावेश आहे. पावसाळ्यात सर्वत्र पाणी साचल्यामुळे माश्यांची पैदास जास्त होते. त्यामुळे पावसाळा सुरु झाला की, माश्यांचा घरामध्ये जणू धुडगूसच सुरु होतो. अशा वेळी घरातील अन्नावर, साठवलेल्या पाण्यावर माश्या घोंगावण्यास सुरुवात होते. ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा स्थितीत माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे हे सुचत नाही. त्रासदायक माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण घरातील काही साहित्यांचा वापर करू शकता. या ४ उपायांमुळे घरात माश्या शिरणार नाहीत(Effective Ways to Get Rid of those Buzzing Houseflies!).

कापूर

कापराच्या धुरामुळे घरात माश्या शिरत नाहीत. घरात कापूर असल्यास रोज संध्याकाळी धूपासोबत कापूर लावा. यामुळे माश्या घरात येणार नाही, व घरातील माश्या बाहेर जातील. घरात चारही कोपर्‍यात कापराच्या गोळ्या टाका. जर माश्या खूप असतील तर कापूर जाळा.

इस्त्री न करता ही कपडे दिसतील कडक, अगदी इस्त्री केल्यासारखे! करा 4 गोष्टी

लिंबू

लिंबाच्या उग्र गंधामुळे माश्या घरात शिरत नाहीत. यासाठी लिंबूचे २ तुकडे करा, त्यात ६ ते ७ लवंगा रोवून ठेवा. घरात जिथे जास्त माश्या दिसतील तिथे लिंबू ठेवून द्या. घरात माश्या येणार नाही.

झाडे लावा

घरात माश्यांनी हैदोस माजवला असेल तर, घरात तुळस, पुदीना आणि लॅव्हेंडर हे झाडे लावा. या झाडांमधील गुणधर्मांमुळे घरात माश्या शिरत नाही. आपण ही झाडे खिडक्या किंवा प्रवेशद्वाराजवळ कुंडीत लावू शकता.

वरण-मसाल्यांचे डाग पडल्याने कुकरचं झाकण पिवळं पडलंय? ३ टिप्स, शिट्टी आणि झाकण होईल स्वच्छ

घर स्वच्छ ठेवा

अस्वच्छ ठिकाणी माश्या जास्त भिरभिरतात. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवा. विशेषत: स्वयंपाकघर, नियमितपणे स्वच्छ ठेवा. कचरा जमा होण्यापासून रोखा. घरात खराब पाणी साठवून ठेऊ नका.

टॅग्स :सोशल मीडियास्वच्छता टिप्ससोशल व्हायरल