टीव्ही जगतातील क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) सर्वांनाच ठाऊक आहे. निर्मिती क्षेत्रात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांना नुकतंच इंटरनॅशनल एमी अवॉर्डने विशेष सन्मानित करण्यात आले आहे. हा बहुचर्चित ५१ वा इंटरनॅशनल एमी अवॉर्ड (International Emmy Award) सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात प्रसिद्ध लेखक दीपक चोप्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारी एकता ही पहिली भारतीय महिला चित्रपट निर्माती ठरली. त्यामुळे त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या भावनांची वाट मोकळी केली. आभारप्रदर्शन करताना एकता यांनी वडील जितेंद्र कपूर (Jeetendra Kapoor) आणि तुषार कपूर (Tusshar Kapoor) यांचे विशेष आभार मानले. पण आभार मानण्याचे पण एक विशेष कारण आहे, ते कारण नक्की काय पाहूयात(Ekta Kapoor thanks brother Tusshar, dad Jeetendra for babysitting her son as she wins International Emmy).
संघर्षाचे दिवस आठवले
न्यूयॉर्कमधील ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात, एकता कपूरला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय डायरेक्टरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकता कपूर पुरस्कार स्वीकारण्यासाठी जशा स्टेजवर आल्या, तेव्हा त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागले, व हा प्रवास किती खडतर आणि आव्हानात्मक होता, याची माहिती दिली. एकता व त्यांच्या आईने बालाजी टेलीफिल्मची सुरुवात जितेंद्र कपूर यांच्या गॅरेजमध्ये केली असल्याचं सांगितलं.
एमी पुरस्कार सोहळ्यात मानले वडील आणि भावाचे विशेष आभार
आभारप्रदर्शन करताना एकता म्हणते, 'प्रतिष्ठित एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळाल्याचा मला आनंद आहे. मी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे. त्यांच्यामुळे मला टीव्ही, चित्रपट आणि ओटीटीच्या क्षेत्रात बदल करण्यास संधी मिळाली. मी माझ्या कामाद्वारे प्रेक्षकांवर सकारात्मक प्रभाव पाडत राहीन.'
एक असं बेट जिथे कानाकोपऱ्यात लटकत आहेत 'डेड डॉल्स'. पाहा झाडाला लटकणाऱ्या बाहुल्यांची रहस्मय वस्ती..
त्या पुढे म्हणतात, '१८ व्या वर्षी मी व आईने मिळून बालाजी टेलीफिल्मची स्थापना केली. करिअरची सुरवात झाल्यानंतर मला 'महिला निर्माता' म्हणून ओळख मिळाली. कारण त्याकाळी हा क्षेत्र पुरुष प्रधान होता. गंमत म्हणजे या जगाची निर्मिती देखील स्त्रियांनीच केलेली आहे. माझ्या आयुष्यातील पुरुषांचे मी विशेष आभार मानते. माझे वडील आणि माझ्या भावाने माझ्या सरोगेट लेकराची विशेष काळजी घेतली. मी कामात व्यग्र असताना त्यांनी माझ्या घराचे घरपण टिकवून ठेवले.
मी माझा मुलगा रवी आणि पुतण्या लक्ष्यचे देखील आभार मानते, त्यांनी माझ्या कठीण काळात साथ दिली. मी सिंगल मदर जरी असले तरी, त्यांना बघून मला काम करण्याची आणखी सकारात्मक उर्जा मिळते.'