Join us  

कित्येक वर्षांनी भेटल्या जुन्या मैत्रिणी! केस पिकले- शरीर थकले तरी मैत्री मात्र तशीच, बघा आजींचा इमोशनल व्हिडिओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 4:00 PM

Emotional Viral Video Of Elderly women: २ आजींची अनेक वर्षांनी भेट झाली. त्यांच्या भेटीचा एक अतिशय भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे...

ठळक मुद्देदोघी जणी जेव्हा एकमेकींना भेटल्या तेव्हा त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी बघण्यासारखा होता.

हल्ली शाळेतल्या, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या बॅचचं रियुनियन किंवा गेट टुगेदर करण्यात आल्याचं आपण नेहमीच ऐकतो. आपणही अशा गेट टुगेदरला जेव्हा उपस्थित राहतो, तेव्हा अनेक वर्षांपुर्वीचे मित्र- मैत्रिणी पुन्हा एकदा नव्याने भेटलेले पाहून खूप आनंद होतो. बऱ्याचदा हा प्रसंग खूप भावनिक वळण घेणारा ठरतो. असाच अपूर्व आनंद या व्हिडिओमधल्या दोन आजीबाईंच्या चेहऱ्यावर बघायला मिळतोय. तोच आनंद पाहून तर नेटिझन्स त्यांच्या प्रेमात पडले असून हा इमोशनल (Emotional Viral Video Of Elderly women) व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. (A friendship of over 80 years)

 

mukilmenon या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ज्या आजी दिसतात त्या दक्षिण भारतीय आहेत. दोघीही अतिशय वयस्कर आहेत.

थायरॉईडचा त्रास कमी करणारे २ व्यायाम, दुखणं नियंत्रणात ठेवण्यासाठी वाचा योगतज्ज्ञांचा सल्ला

पण त्यापैकी एकीची तब्येत जरा बरी आहे. तर दुसरी अगदीच थकलेली आहे. ज्या आजी तब्येतीने थोड्या बऱ्या आहेत, त्या त्यांच्या आजारी मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेलेल्या आहेत. 

 

व्हिडिओला जे कॅप्शन देण्यात आलं आहे, त्यात म्हटलं आहे की या दोन्ही आजींची मैत्री ८० वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहे. हा व्हिडिओ ज्यांनी केला आहे, त्यांची आजी त्यांना नेहमी म्हणायची की तिला तिच्या बालमैत्रिणीला भेटण्याची खूप जास्त इच्छा आहे.

१ हजार रुपयांत भरजरी साडी! लग्नसराईसाठी कमी पैशात सुंदर साडी घ्यायची तर हे ३ पर्याय एकदा बघाच

आजीची इच्छा पुर्ण करण्यासाठी मग त्या व्यक्तीने पुढाकार घेतला. आजीच्या बालमैत्रिणीला शोधून काढलं आणि मग तिला घरी भेटायला बोलावलं. दोघी जणी जेव्हा एकमेकींना भेटल्या तेव्हा त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी बघण्यासारखा होता. भेट झाली, गप्पा झाल्या आणि निघताना मात्र पुन्हा एकदा दोघीही भावनिक झाल्या. एकमेकींचे हात हातात धरून बसल्या आणि मग एकमेकींचा निरोप घेतला.

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामज्येष्ठ नागरिक