Join us  

भल्या सकाळी तरुणीला झोपेतून उठवायला आला हत्ती! खिडकीजवळ उभ्या हत्तीला पाहून झोप उडणार नाही तर काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 5:44 PM

Elephant Wakes Up Woman : सकाळी झोपेतून उठताच एकदम तुमच्या खिडकीत हत्ती येऊन उभा राहिलेला दिसला तर..

कल्पना करा की तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये छान निवांत सुटी एन्जॉय करताय. पहाटे साखर झोपेत आहात आणि तुमच्या खिडकीतून  येऊन एक हत्ती सोंड हलवत तुम्हाला उठवत आहे. ही कल्पनाच किती रम्य, सुखावणारी वाटते.  (Elephant Wakes Up Woman) कंटेंट क्रिएटर साक्षी जैन थायलंडमध्ये सुट्टीवर होती आणि तिने चियांग माई येथील एका रिसॉर्टमधील एक प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे.  इथे रिसेप्शन कॉल किंवा अलार्म नाही तर  हत्तीच्या उठवण्यामुळे ती जागी होते. (Elephant wakes up woman sleeping in hotel room in Thailand. Viral video has over 51 million views)

सुरूवातीला झोपेत असलेल्या साक्षीला तिच्या खोलीच्या खिडकीबाहेर हत्तीची सोंड पाहून थोडा धक्का बसतो. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर गेल्या आठवड्यात पोस्ट करण्यात आला होता आणि त्याला 51 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हत्तीचं आणि माणसांचं नात आपण अनेकदा आपण चित्रपटातून पाहिलं आहे. एवढा विशालकाय देह पाच साडे पाच फुटाच्या माणसाचे ऐकतो. माणसांवर प्रेम करतो आणि माणसांप्रमाणेच  हत्तीला भावभावना असतात हे हा व्हिडिओ पाहून तुमच्या सहज लक्षात येईल.

टोल नाक्यावर ट्रकनं जोरदार धडक दिली; जीवाची बाजी लावून तरुणी मदतीला धावली, पाहा व्हिडिओ 

“चियांग माई, थायलंडमधील या रिसॉर्टमध्ये अलार्मऐवजी हत्ती तुम्हाला जागे करतात. त्याहूनही चांगले की तुम्ही त्यांच्यासोबत चालून, बोलून त्यांना खायला घालू शकता. त्यांची आंघोळ करू शकता आणि जवळून खेळू शकता.  पुढच्यावेळी तुम्ही थायलंडला जायचा विचार कराल तेव्हा तुमच्या सहलीमध्ये पर्वत, नद्या आणि हत्तींनी वेढलेल्या चियांगमाई शहराचा समावेश करायला विसरू नका,”  असं  या व्हिडिओच्या मथळ्यात लिहिलंय.

भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीनं शाळकरी मुलीला चिखलानं पूर्ण माखवलं; तिचा चेहरा पाहून लोक म्हणाले..

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून एका युजरनं म्हटलं की, 'मला वाटतं तिला हत्ती उठवायला कळायच्या आधीच तिचं हृदय एका सेकंदासाठी थांबलं होतं.'

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल