Join us

इलॉन मस्कच्या लेकाचं नाव काय तर? X ! स्मार्ट एक्सचा पाहा गोड गुटगुटीत व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 20:17 IST

Elon musk share son x pix with x logo viral : इलॉन मस्क यांनी या फोटोवर कोणतंही कॅप्शन लिहिलेलं नाही.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क(Elon musk) यांनी आपल्या छोट्या मुलाचा फोटो इंस्टावर शेअर केला आहे.  हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इलॉन मस्कच्या यांच्या मुलाचं नाव सुद्धा एक्स असून (Elon musk share son x) व्हायरल होत असलेल्या या फोटोत तो एका मोठ्या एक्सच्या बोर्डसमोर उभा आहे. त्यानं पांढऱ्या रंगाचं टि शर्ट आणि खाकी पँन्ट घातली आहे. आपल्या हातात त्याने एक टंबलर पकडलेलं असून तो उभा राहून हसत आहे. 

इलॉन मस्क यांनी या फोटोवर कोणतंही कॅप्शन लिहिलेलं नाही. पोस्ट केल्यानंतर जवळपास ४ मिलियन लोकांनी हा फोटो पाहिला आहे.  याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात लोकांनी या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. या लोकांनी या लहान मुलाचा निरागसपणा, खेळकर वृत्तीचे निरीक्षण केले आहे. 

अनेकांनी मस्करी करत एक्सची तुलना इलॉन मस्क यांच्याशी केली आहे. सोशल मीडिया युजर्स म्हणाले की आपल्या पित्याकडून त्याला हे गुण मिळाले आहेत. या मुलाचा क्यूटनेस कमाल आहे आणि या फोटोवरून नजर हटत नसल्याचे अनेकांनी म्हटलंय. या मुलाचे हास्य अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान मस्क यांनी ChatGPT करणाऱ्या OpenAI शी स्पर्धा करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलेजन्स कंपनी XAI लॉन्च केली आहे. त्यांनी ट्विटरवर सांगितले की, नवीन  कंपनीचा उद्देश  जगाची वास्तविकता समजून घेणे आणि जीवनासमोरील मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे हा आहे.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कसोशल व्हायरलसोशल मीडिया