Join us  

'बेटी शादीके बाद पराई नहीं होती, सिर्फ..!' पुतणीची पाठवणी करताना अनुपम खेर झाले इमोशनल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 3:38 PM

Social viral: लग्न झालं की मुलगी पराई होते... असं आपल्याकडे अगदी सहज म्हटलं जातं... बघा ज्येष्ठ अभिनेते अनुपम  खेर ( Anupam Kher) हे याबाबत काय म्हणत आहेत... त्यांची ही इमोशनल पोस्ट सोशल मिडियावर (social media) जबरदस्त व्हायरल होत आहे. 

ठळक मुद्देही पोस्ट शेअर करत अनुपम खेर यांनी त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे.

बेटी म्हणजे पराया धन... लग्न झालं की मुलगी परक्याची होते.... असं काय काय नेहमीच आपल्याकडे मुलींबाबात बोललं जातं. यामुळेच तर जेव्हा मुलीचं लग्न होतं, तेव्हा तो क्षण म्हणजे त्या मुलीसाठी, तिच्या आई- वडिलांसाठी आणि नातलगांसाठी खूप भावनिक असतो. नुकताच असाच अनुभव घेतलाय ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी. अनुपम खेर यांच्या लहान भावाच्या मुलीचं २- ३ दिवसांपुर्वी लग्न झालं. यानंतर अनुपम खेर यांनी याविषयीची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केली असून ती पोस्ट खूपच इमोशनल (Emotional post shared by actor Anupam Kher) आहे.

 

प्रत्येक आई- वडिलांना आपल्या मुुलीबाबत काय वाटत असतं, हेच जणू त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. अनुपम खेर यांचे छोटे भाऊ म्हणजे राजू खेर. राजू खेर (Raju Kher) यांची मुलगी वृंदा (Vrunda Kher) हीचं नुकतंच लग्न झालं. या लग्नात अनुपम खेर यांनी त्यांच्या कुटूंबियांसोबत काय- काय धमाल केली याचे फोटोही सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. पण या फोटोंपेक्षाही जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते अनुपम खेर यांच्या शब्दांनी. 

 

ते म्हणतात की 'नुकतंच वृंदाचं लग्न झाली. ती एवढी मोठी कधी झाली हे कळलंच नाही. लग्न झालं की मुली परक्या होतात, असं म्हटलं जातं. पण माझं म्हणणं हे आहे की आम्ही केवळ तिचं घर शिफ्ट केलं आहे. आता ती मुंबईहून दिल्ली येथे रहायला जाणार. तिचा नवरा निपूण याच्या घरी. आता तिचे दोन परिवार असून सुख- दु:ख वाटून घ्यायला तिच्यासोबत खूप लोक आहेत..'. ही पोस्ट शेअर करत अनुपम खेर यांनी त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे. लग्नानंतर मुलींच्या पाठवणीबाबत त्यांनी केलेला हा विचार किती निर्मळ आहे आणि तो तसाच समाजाकडून स्विकारला जावा, अशी अपेक्षाही यानिमित्ताने नक्कीच प्रत्येक मुलगी व्यक्त करत असणार... 

 

वृंदा ही एक ब्लॉगर असून ब्यूटी आणि फॅशन याविषयी ती सातत्त्याने ब्लॉग लिहित असते. तिचा नवरा निपूण गांधी हा वेडिंग प्लॅनर असून दोघेही मागच्या काही वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. दिल्ली येथे नुकताच अतिशय थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासह अनेक मान्यवरांनी या लग्नाला उपस्थिती लावली. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालग्नअनुपम खेरसेलिब्रिटी