Join us  

हृदयस्पर्शी! मंगलाष्टकं ऐकून मंडपात सासूबाईंसह पाहुण्यांना कोसळलं रडू; पाहा हा इमोशनल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 8:17 PM

Emotional Video : सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही भावूक व्हाल.

लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातला हा खूप मोठा निर्णय असतो. मित्राच्या किंवा नातेवाईंकांच्या कोणच्याही लग्नात गेल्यानंतर तेथील प्रसंग, वातावरण पाहून मन भावूक होतं. लेकीला सासरी जाताना पाहून आई वडीलांची अवस्था कशी होत असेल याचा विचारही केला जात नाही. लहानपणापासून लाडात वाढवलेली लेक ४ दिवसांच्या लग्न समारंभानंतर दुसऱ्याच्या घरी जाणार याच विचारानं आई वडीलांच्या काळजात धडकी भरते. (Emotional video of wedding people gets emotional video goes viral)

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही भावूक व्हाल. लग्नात मंगलाष्टकं सुरू असताना नवऱ्यामुलाची आई भावूक झाली. त्यानंतर मंडपातील सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले.  मंगलाष्टका आणि गाणं यात फरक असला जरी बोध चांगला आहे.

हे सादरीकरण खूपच छान झाले आणि आम्हाला ऐकून भावूक झालो. कारण आमच्या मोठ्या बहिणीचं लग्न झाले त्यावेळीला घरातील मंडळी पै पाहुणे खूप रडले. सोहळा आनंदाचा पण  सासरला जाते म्हणून लोक भावूक होतात. अशी कमेंट एका युजरनं केली आहे. खरच दादा खूप छान.. आणि गोड आवाज आहे तुमचा.... मंगलाष्टक एकताना अक्षरशः डोळ्यात अश्रू आले असंही काही युजर्स म्हणाले आहेत. प्रशमेश बोरकर नावाच्या व्यक्तीनं मंगलाष्टकं म्हटल्याचं समोर येत आहे. 

मृत्यूनंतरही आई आली लग्नाच्या मांडवात, मुलाला दिला आशीर्वाद, अन्....

पाटीलजी या वेब पोर्टलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  ५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि ५०० लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरललग्न