Join us  

वडिलांना नोकरी लागताच पोरीनं आनंदाच्या भरात केलं ‘असं’ काही, दृश्य पाहून डोळ्यात पाणीच येईल..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 9:40 AM

Emotional Video : मुलीच्या या गोंडस प्रतिक्रियेने अनेकांची मने जिंकली.

वडील आणि मुलीच्या नात्याशी संबंधित अनेक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. नुकताच असाच एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (Viral Video) वडील आणि मुलीचे नाते खूप खास असतं. वडिलांपेक्षा मुलींना त्यांच्या भावना कशा व्यक्त करायच्या हे चांगले कळतं. बाप-लेकीच्या नात्याचा हा हळवा व्हिडीओ सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. (Excited daughter jumped at father got to know about his new job heart touching video goes viral)

या व्हिडिओमध्ये शाळेच्या ड्रेसमध्ये एक चिमुरडी डोळ्यांवर हात ठेऊन दिसू शकते. समोर त्याचे वडील स्विगीचा टी-शर्ट हातात घेऊन उभे आहेत. खरं तर, वडिलांना नवीन नोकरी मिळाली आहे, ज्याबद्दल त्यांना अशा प्रकारे एक सरप्राईज देऊन आपल्या मुलीला सांगायचे आहे.मुलीने डोळे उघडताच, वडिलांकडे स्विगी टी-शर्ट पाहून ती आनंदाने उडी मारते.

हॉटेलमध्ये जेवता जेवता अचानक अटॅक आला; महिला वेटरच्या प्रसंगावधानं वाचवले प्राण, पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही मुलीच्या आनंदाची कल्पना करू शकता. मुलगी उत्साहात उड्या मारू लागते आणि पळून जाऊन वडिलांना मिठी मारते. आपल्या मुलीची अशी प्रतिक्रिया पाहून वडिलांच्याही चेहऱ्यावर हसू उमटते. मुलीच्या या गोंडस प्रतिक्रियेने अनेकांची मने जिंकली. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ लोकांचे खूप मनोरंजन करत आहे. आत्तापर्यंत लाखो वेळा पाहिले गेले आहे. इतकेच नाही तर हजारो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) व्हिडिओला लाइकही केले आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आले तर अनेक यूजर्सने कमेंटही केल्या.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया