लहान मुले आणि आजी-आजोबा यांच्यातील नातं काही वेगळंच. आजी आजोबांशिवाय करमत नाही किंवा आजी आजोबांची फार सवय आहे अशी लहान मुलं तुम्हाला खूप दिसत असतील. (Emotional Video) इंस्टाग्रामवर शेअर केलेला एक खास व्हिडिओ एक गोंडस मुलगी आणि तिचे पणजोबा यांच्यातील सुंदर नातं आणि त्यातील गोडवा दर्शवितो. (Great grandfather lying on the bed great granddaughter start kissing video got millions views)
व्हिडिओमध्ये पणजोबा आणि पणजी या दोघांची जोडी दाखवली आहे. ज्यांच्यात जवळपास 97 वर्षांचे अंतर आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना त्यांच्या आजी आजोबांसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Emotional Video)
पणजोबा आणि पणतीच्या हृदय पिळवटून टाकणार्या व्हिडिओला 'कुटुंब: पणजोबा आणि पणजीतील एक हळुवार क्षण शेअर करत आहे- त्यांच्यातील 97 वर्षांचे अंतर'. असे कॅप्शन दिले आहे. मनमोहक व्हिडिओचे कॅप्शन वाचून तुम्हीही खूप भावूक व्हाल आणि चेहऱ्यावर आपोआप हसू येईल. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर झाल्यापासून नेटिझन्स त्यावर प्रेमाच्या इमोजीसचा वर्षाव करत आहेत.
बोंबला! महिलेच्या पाठीवर बसून अख्खं शहर फिरत होती पाल; मागच्या कारवाल्यानं काढला व्हिडिओ
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर अपलोड केल्यापासून व्हिडिओला 1.8 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. गुडन्यूज_मूव्हमेंट नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. एका यूजरने इंस्टाग्रामवर लिहिले, 'ओह माय हार्ट, खूप सुंदर.' दुसऱ्या युजरने म्हटले की, 'त्याचे शरीर थकले आहे, पण ते प्रेम खूप तरुण आणि शुद्ध आहे.' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, 'माझ्या आजी-आजोबांसोबत मी मोठा झालो, मी खरंच भाग्यवान होतो आणि तरीही त्यांची खूप आठवण येते.'