सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (viral video) झाला आहे. तसं पाहिलं तर हा व्हिडिओ तसा काही महिन्यांपुर्वीचा. पण आता मात्र तो सोशल मिडियावर ट्रेण्डिंग असून नेटीझन्स त्याला चांगलंच पसंत करत आहेत. हल्ली टॅटू करण्याची फॅशन आहे. तरुण मंडळी बऱ्याचदा त्यांच्या जोडीदाराची नावं किंवा काही सिंम्बॉल्स स्वत:या अंगावर काढून घेत असतात. पण इथे या तरुणीने मात्र तिच्या आजी- आजोबांच्या नावाचा टॅटू (tattoo of her grand parents name ) करून घेतला आहे.
@agustinawetzel या twitter पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगी आणि तिचे आजी- आजोबा दिसत आहेत.
मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..
आजी- आजोबांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या तरुणीने हा टॅटू काढून घेतला आहे. ते तिघे कोणत्या देशातले हे व्हिडिओवरून स्पष्ट होत नसलं, तरी हा व्हिडिओ मात्र जगभर मोठ्या उत्सूकतेने बघितला जात आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की तरुण मुलगी सुरुवातीला तिच्या आजी- आजोबांकडून कागदावर त्यांचे नाव लिहून घेते. त्यांना खरे कारण कळू नये, म्हणून काही तरी बहाणा सांगते. त्यानंतर काही दिवसांनी आजी- आजोबांच्या अक्षरातल्याच नावाचा हुबेहूब टॅटू स्वत:च्या पायावर काढून घेते.
दिवाळीत नवा प्रेशर कुकर घ्यायचाय? खरेदी करताना कायम तपासून पाहा ३ गोष्टी, निवडा उत्तम कुकर
आजी- आजोबा दोघेही निवांत बसलेले असताना, त्यांना तिच्या पायावरचा टॅटू दाखवते. आपलं नाव जशास तसं नातीच्या पायावर बघून आजोबा मात्र अतिशय भावूक होऊन जातात. त्यांना त्यांचे अश्रू आवरणं कठीण होऊन जातं. अशीच काहीशी प्रतिक्रीया तिला आजीकडूनही येते. हा व्हिडिओ पाहून काही जण इमोशनल होऊन गेले तर काही जणांच्या त्यांच्या आजी- आजोबांची आठवण आली..