लहानपणापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली लेक सासरी जाताना पाहण्याचं दु:खं कोणालाही सहन होत नाही. मुली आपल्या आई आणि वडिलांचे जीवन हजारो प्रकारे सजवतात. आई वडीलांची काळजी घेण्यापासून अगदी न सांगता सर्व गोष्टी करण्यापर्यंत मुलींची सगळ्यांच बाबतीत सवय झालेली असते. आयएएस अधिकारी संजय कुमार यांनी शेअर हा व्हिडिओ मुलगी आणि तिच्या पालकांमधील निस्वार्थ प्रेम दाखवतो. (Emotional Video)
या जोडप्याने त्यांच्या मुलीच्या पावलांचे ठसे घेतले आणि तिच्या पाठवणीच्या आधी एक सुंदर आठवण घरी सजवून ठेवली. त्याचवेळी ही व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळी ते मांडण्यास सुरुवात केली. या व्हायरल व्हिडिओबद्दल लोकांचे मत काय आहे ते जाणून घेऊया. (Parents washed daughters feet with milk and then drank it leaves internet divided see viral video)
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आयएएस अधिकारी संजय कुमार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 2 मिनिट 20 सेकंदाच्या क्लिपमध्ये एक माणूस मोठ्या ताटात पाण्याने आपल्या मुलीचे पाय धुताना दिसत आहे. मग त्यांनी तिचे पाय दुधाने धुवून एका भांड्यात ठेवले. यानंतर, जोडप्याने एक एक करून भांड्यातील दूध प्यायले. यानंतर तिच्या पायाचे ठसे उमटवले. मुलही जन्माला आल्यानंतर ज्याप्रमाणे लाड केले जातात. त्याचप्रमाणे पाठवणीच्या वेळीही या मुलीचे लाड करताना आई वडिल दिसून आले.
२ लेकरांना सोबत घेऊन फुड डिलिव्हरीसाठी पायपीट करतेय माऊली; इमोशनल-अस्वस्थ करणारा व्हिडिओ
यानंतर तुम्हाला ती मुलगी पांढऱ्या कपड्यावर चालत होती. जेणेकरून तिच्या पायाचे ठसे त्याच्यावर सापडतील. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "भावनिक क्षण. आई-वडील त्यांच्या मुलीच्या जाण्याआधी तिच्या पायाचे ठसे घरी ठेवतात."
बिकिनीत फिरणाऱ्या तरुणींमध्ये अचानक आली साडी नसलेली बाई , पाहा व्हायरल रिॲक्शन
ऑनलाइन शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाखाहून अधिक वेळा पाहिला ,गेला आहे. लोक सतत व्हिडिओवर कमेंट करत आहेत. काही लोक पालकांच्या हावभावाने आश्चर्यकारकपणे प्रभावित झाले होते. तर काहींना हा प्रकार आवडला नाही. एका वापरकर्त्याने लिहिले, "OMG. खूप हृदयस्पर्शी." दुसर्याने लिहिले, "तुम्ही कोणत्या युगात राहत आहात."