Join us  

आपल्याला किती हुंडा मिळू शकतो? लोक ऑनलाईन वापरू लागले हुंडा कॅल्क्युलेटर..पाहा लग्नाचा बिझनेस..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2024 1:14 PM

‘Ended up better than I imagined': Here's why netizens are lauding the viral dowry calculator on Shaadi.com : हुंड्याची किंमत दाखवण्याऐवजी; हुंडा कॅल्क्युलेटरने दाखवली..

लग्न (Marriage) हे दोन जीवाचे आणि दोन परिवाराचे मिलन मानले जाते (Shaadi.com). परंतु, अजूनही देशामध्ये हुंडारुपी पिडा महिला आणि तिच्या परिवाराला सहन करावे लागत आहे. आजच्या काळात हुंडा (Dowry) देणे आणि घेणे सामाजिक दुष्कृत्य मानले जाते. ही एक कौटुंबिक गोष्ट जरी असली तरी, सध्या ऑनलाइनद्वारे आपल्याला हुंडा किती मिळणार? हे कळू शकणार आहे (Social Viral).

आपण हुंडा मिळवण्यासाठी किती पात्र आहात? हे आपल्याला आता एका मॅट्रोमॉनी साईटवरून समजणार आहे. पण खरंच या साईटवरून आपल्याला हुंडा किती मिळणार हे समजणार की, जागरूकता पसरवण्यासाठी साईटने पाऊल उचललंय पाहूयात(‘Ended up better than I imagined': Here's why netizens are lauding the viral dowry calculator on Shaadi.com).

हुंडा कॅल्क्युलेटर ऑनलाइन उपलब्ध

शादी डॉट कॉम या ॲप्लिकेशनने हुंडा फीचर अॅड केलं आहे. जे पाहून लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. या फीचरमध्ये आपणास किती हुंडा मिळू शकतो, याचा कॅल्क्यूलेटर उपलब्ध आहे. यामध्ये युझरला 'आपण हुंडा घेण्यास किती पात्र आहात?', मुलाचं वय, व्यवसाय, उत्पन्न, शिक्षण, तुमचे स्वतःचे घर आहे की नाही? आपण भारतात राहतात की परदेशात? हुंडा कॅल्क्युलेटरमध्ये सर्व माहिती भरल्यानंतर 'कॅल्क्युलेटर हुंडा रक्कम' असे लिहिलेले बटण दिसते. क्लिक केल्यानंतर थक्क करणारी गोष्ट समोर येते.

गरम पाण्यात मध, रात्री दही खाणं घातक! आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, आजारांना आमंत्रण देणं सोडा..

अखेर हे संपूर्ण प्रकरण काय आहे?

क्लिक करताच, एक डेटा समोर येतो. यामध्ये '२००१ ते २०१२ दरम्यान, भारतात हुंड्यामुळे ९१,२०२ लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवाची किंमत इतकी आहे का? चला भारताला हुंडामुक्त बनवूया. बदल घडवूया.' असा मेसेज समोर येतो. सध्या हुंडा कॅल्क्युलेटर सोशल मीडियात व्हायरल झाला असून, लोक या मॅट्रोमॉनी साईटचं कौतुक करीत आहे.

'गुलाबी रिक्षेतून प्रवास युपी व्हाया लंडन - थेट प्रिन्स चार्ल्सच्या घरात'..१८ वर्षांच्या मुलीची पाहा भरारी..

आधी धक्का आणि मग..

सोशल मिडीयावर याबाबत अनेकांनी कमेण्ट करून विचार शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, 'शादी, कॉम मधील हुंडा कॅल्क्युलेटर पाहून सुरुवातीला धक्का बसला, पण नंतर कळलं की हुंड्यामुळे किती मृत्यू झाले आहेत हे सांगणारा हा उपक्रम आहे.' तर दुसऱ्याने 'आम्हाला असा देश बनवायचा आहे, जिथे वडील पैशाशिवाय आपल्या मुलीचे लग्न लावू शकतील.' 

टॅग्स :लग्नहुंडासोशल व्हायरलसोशल मीडिया