Weird Disease : जगात असे अनेक आजार आहेत, ज्यांबाबत आजही लोकांना माहीत नाही. काही आजार असेही असतात जे विचित्र वाटतात, पण खूप त्रासदायक असतात. इंग्लंडच्या एका २५ वर्षीय तरुणीला असाच एक दुर्मीळ आजार झालाय. ज्याबाबत वाचाल तर तुमचाही विश्वास बसणार नाही. सामान्यपणे कुणीही एक जोडी सॉक्स वापरतात. पण ही तरूणी घरात राहूनही ६ जोडी सॉक्स घालते. हे तर काहीच नाही याहून पुढे जात ती जेव्हा जेव्हा फ्रीज उघडते तेव्हा तिला हॅण्डग्लोव्ह्जचा घालावे लागतात.
एका मीडिया रिपोर्टनुसार, विनचेस्टर येथे राहणारी फिटनेस ट्रेनर एलेन फिट्जगिब्बिन्सला फारच विचित्र आजार झाला आहे. या आजारामुळे ती तिची रोजची कामंही करू शकत नाही. एलेनला रेनॉड्स सिंड्रोम (Raynaud’s syndrome) नावाचा आजार आहे. या आजारात थंडीमुळे व्यक्तीच्या शरीरावर चट्टे पडू लागतात आणि सोबतच वेदनाही होतात. जास्त थंडी, चिंता आणि अवघडलेपणा यावेळ व्यक्तीला या समस्या होतात. हा एकप्रकारचा ऑटो इम्यून आजार आहे.
कसं असतं रोजचं जगणं?
एलनची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, घरात तिला एकाचवेळी तीन ते सहा जोडी सॉक्स एकावर एक घालावे लागतात. ती हीटरचा देखील वापर करते. त्यामुळे विजेचं बिलही भरमसाठ येतं. त्यामुळे हीटरचा सतत वापरही करू शकत नाही. जर तिनं सॉक्स घातले नाही तर पाय पिवळे पडतात आणि हातांवर लाल चट्टे येतात. ज्यामुळे तिला असह्य वेदनाही होतात. फ्रीजचा दरवाजा उघडताना तिला हॅण्डग्लोव्ह्ज वापरावे लागतात. फ्रीजमधील भांडही ती हाती घेऊ शकत नाही.
एलनला २०१९ मध्ये या आजाराबाबत समजलं होतं. २०२१ मध्ये तिला कोएलिएक आजार झाला होता. जो एकप्रकारचा ऑटो इम्यून आजार आहे. त्याशिवाय तिला ग्लटननं देखील रिअॅक्शन होत होतं. आता तिला खास प्रकारची डाएट फॉलो करावी लागते. ती थंड काही खाऊ शकत नाही. महत्वाची बाब म्हणजे असं असूनही ती एक फिटनेस ट्रेनर आहे आणि लोकांना निरोगी राहण्यासाठी टिप्स देते. सोबतच जिममध्येही मदत करते.