Lokmat Sakhi >Social Viral > पाकिस्तानी तरुणीला ‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान’चा मुकूट, मात्र देशात अनेकजण चिडले कारण..

पाकिस्तानी तरुणीला ‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान’चा मुकूट, मात्र देशात अनेकजण चिडले कारण..

Erica Robin- Miss Universe Pakistan: मिस युनिव्हर्स पाकिस्तान या स्पर्धेमुळे वाद का होतोय? नेमका कशाला विरोध आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 07:59 PM2023-09-18T19:59:18+5:302023-09-18T20:00:04+5:30

Erica Robin- Miss Universe Pakistan: मिस युनिव्हर्स पाकिस्तान या स्पर्धेमुळे वाद का होतोय? नेमका कशाला विरोध आहे?

Erica Robin has been crowned the winner of the first-ever 'Miss Universe Pakistan', What is the controversy about this competition? | पाकिस्तानी तरुणीला ‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान’चा मुकूट, मात्र देशात अनेकजण चिडले कारण..

पाकिस्तानी तरुणीला ‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान’चा मुकूट, मात्र देशात अनेकजण चिडले कारण..

Highlightsएरिकाला तिथल्या सरकारचा विरोध असला तरी सामान्य पाकिस्तानी मात्र तिच्या निवडीने अतिशय आनंदित झाले असून तिला वर्षाअखेरीस होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी शुभेच्छाही देत आहेत.

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपला शेजारी देश पाकिस्तान चर्चेत असतो. आता त्या देशाची एवढी चर्चा होण्याचं  कारण म्हणजे मिस युनिव्हर्सपाकिस्तान ही स्पर्धा.. ही स्पर्धा काही दिवसांपुर्वी मालदिव येथे मोठ्या थाटामाटात पार पडली. ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुळच्या कराची येथे राहणाऱ्या २४ वर्षीय एरिका रॉबिन या सौंदर्यवतीला 'मिस युनिव्हर्स पाकिस्तान' म्हणून मुकूटही घालण्यात आला (Erica Robin has been crowned the winner of the first-ever 'Miss Universe Pakistan'). त्यानंतर ही गोष्ट व्हायरल झाली. तिच्या सौंदर्याची आणि या स्पर्धेची चर्चा सगळ्या जगभरात होऊ लागली आणि तिथेच  खरी वादाची ठिणगी  पडली. ( controversy about this competition)

 

वाद निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानच्या विद्यमान सरकारचं असं म्हणणं आहे की अशा सौंदर्यस्पर्धा शासकीय परवानगीने आणि काही सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होत असतात.

गणपतीच्या नैवैद्यात हवीच २१ भाज्यांची भाजी, मिक्स भाजीचा पारंपरिक टेस्टी प्रकार- करायलाही सोपी

मात्र या स्पर्धेसाठी आयोजकांनी पाकिस्तान सरकारची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे त्याच्या लेखी ही स्पर्धा आणि एरिकाची झालेली निवड पुर्णपणे अवैध ठरविण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये निवड झाल्यामुळे आता एरिका या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या मिस युनिव्हर्स या स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करणार आहे. पण पाकिस्तान सरकारने यालाही विरोध दर्शविला आहे.

 

एरिकाला तिथल्या सरकारचा विरोध असला तरी सामान्य पाकिस्तानी मात्र तिच्या निवडीने अतिशय आनंदित झाले असून तिला वर्षाअखेरीस होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी शुभेच्छाही देत आहेत.

लॅपटॉप- कम्प्यूटरवर सतत काम करून खांदे, मान- पाठ आखडली? फक्त ३० सेकंदाचा व्यायाम, लगेच वाटेल रिलॅक्स

तेथील बहुतांश लोकांच्या मते एरिकाला होणारा विरोध हा निंदनीय आणि स्त्री द्वेषातून होत असून कोणताही पाकिस्तानी जगाच्या पाठीवर होणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करू शकतो. त्यासाठी सरकारची परवानगी घेण्याची काहीही गरज नाही... स्वत: एरिकाही हा विरोध झुगारून येणाऱ्या स्पर्धेसाठी अतिशय उत्सूक आहे. ती म्हणते की ही स्पर्धा जिंकून पाकिस्तानच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आजवर जगासमोर कधीही येऊ शकल्या नाहीत, त्यांना सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न ती करणार आहे. तिला विराेध करणारे हात अनेक असले तरी शुभेच्छा देणारेही तेवढेच तिच्या पाठीशी आहेत. 
 

Web Title: Erica Robin has been crowned the winner of the first-ever 'Miss Universe Pakistan', What is the controversy about this competition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.