आजकाल प्रत्येक घरामध्ये प्लास्टिकच्या वस्तू हे असतातच. प्लास्टिकच्या वस्तू हे वजनाला फार जड नसतात. ज्यामुळे त्याचा वापर हा अधिक प्रमाणावर केला जातो. आपल्या प्रत्येक घरामध्ये प्लास्टिकच्या स्टूलचा वापर होतो. रंगी - बेरंगी, विविध आकाराचे स्टूल दिसायला फार आकर्षक दिसतात. जे लवकर खराब होत नाही, वर्षानुवर्षे टिकतात.
पण आपण कधी प्लास्टिकच्या स्टूलला निरखून पाहिलं आहे का? प्लास्टिकच्या स्टूलवर तुम्हाला छोटे छिद्र दिसतील. या छिद्रांचा नेमका वापर कसा होतो? हा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच आला असेल. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर पाहूयात(Ever Wondered Why There Is A Hole In The Plastic Stool You Use?).
प्लास्टिकच्या स्टूलला छिद्रांमुळे मिळते घट्ट पकड
स्टूलच्या मध्यभागी छिद्र असण्याचं कारण, स्टूलला यातून मजबुती मिळते. प्लास्टिक स्टूलच्या मध्यभागी गोल आकाराचे छिद्र असते. स्टूलवर बसताना जास्त दाब पडतो. ज्यामुळे ते एकमेकांना चिकटू शकतात. अधिक करून छोट्या आकाराच्या स्टूलांवर हे छिद्र दिसून येतात.
नेलकटरसोबत असणाऱ्या दोन सुऱ्यांचे नक्की काम काय? कशासाठी त्यांचा वापर होतो?
एकावर एक स्टूल ठेवण्यास होत नाही अडचण
घरात किंवा दुकानात जागेची अडचण निर्माण होतेच. अशा वेळी एकावर एक स्टूल ठेवले जातात. स्टुलला छिद्र असल्यास ते ठेवण्यास सोपे जाते. एकावर एक स्टूल ठेवल्यास हवेचा दाब वाढतो. ज्यामुळे स्टूल एकमेकांना चिकटण्याची शक्यता वाढते. एअर प्रेशर व वॅक्यूममुळे ते चिकटतात. जे सहसा लवकर निघत नाही. स्टूलवर छिद्र असल्याने ते एकमेकांना चिटकत नाही. व ते लवकर वेगळे होतात.
प्लास्टिक स्टूल उचलण्यास सोपे
प्लास्टिक स्टूल एकावर एक ठेवल्याने, त्यांच्यावर एअर प्रेशर पडतो. ज्यामुळे ते एकमेकांना चिटकतात. छिद्र असल्यामुळे ते काढणे सोपे जाते. मधोमध असलेल्या छिद्रांमध्ये अंगठा किंवा बोट घालून काढल्यास ते सहज काढण्यास मदत मिळते.
‘ती’ ५ दिवस घनदाट जंगलात हरवली, आयुष्यात दारु प्यायली नव्हती पण पाणी नव्हतं म्हणून..
छिद्रांमुळे तुटत नाही स्टूल
जर एखादी जास्त वजन असलेली व्यक्ती स्टूलवर चढली तर, स्टूल डळमळत नाही, किंवा तुटतही नाही. यामागे छिद्रांची मुख्य भूमिका आहे.