Join us  

पावसाळ्यात घरभर माश्या-लाइटभोवतीचे किडे फिरतात? करा ४ घरगुती उपाय- किटकांचा त्रास कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2023 7:41 PM

4 Simple Ways To Keep Insects Away This Monsoon Season : पावसाळ्यात चिखल-ओलसरपणा यानं घरात लहानसहान किडे येतात, त्यांचा बंदोबस्त कसा करायचा?

उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्याचा आपण सगळेचजण अतिशय मनापासून आनंद घेतो. येणारा पावसाळा हा कितीही आनंददायी असला तरीही त्याचबरोबर तो अनेक समस्या घेऊन येतोच. पावसाळ्यात येणारं आजारपण, सगळीकडे दमट वातावरण, साचलेला चिखल यांसोबत घरात सतत वावरणारे लहान किडे अशा अनेक समस्या असतात. पावसाळ्यात घरात, किचनमध्ये सतत येणारे किडे, माशा सारखे आपल्या कानाजवळ घोंघावत असतात त्यामुळे यांचा आपल्याला खूप त्रास होतो. त्याचबरोबर यांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी फक्त दरवाजे आणि खिडक्या बंद करणे पुरेसे ठरत नाही. एवढेच नव्हे तर यातील काही किडे, डास हे इतके विषारी असतात की त्यांच्या दंश करण्याने आपण आजारी पडू शकतो. 

पावसाळ्यात घरात सतत येणाऱ्या या किड्यांपासून आपली सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. काहीवेळा आपण विषारी स्प्रे, गोळ्या किंवा रासायनिक औषधांचा वापर करतो. परंतु कितीही केले तरीही या सगळ्या गोष्टी रासायनिक व केमिकल्सयुक्त असतात, त्यांचा आपल्याला अपाय होऊ शकतो. इतकेच नाही तर काहीवेळा यांचा वापर करूनही घरातून किडे जाता जात नाहीत. अशावेळी आपण किचनमधील एका गोष्टीचा वापर करून घरातील किडे, मुंग्या सहज घालवू शकतो. नक्की काय आहे हा उपाय ते पाहूयात(everything you need to know on how to keep the bugs and Insects away this rainy season).

पावसाळ्यात घरात सतत येणाऱ्या किडे, मुंग्या, पाखर यामुळे हैराण ? करा एक सोपा उपाय... 

१. झुरळे घालवण्यासाठी हळदीचा वापर :- घरातील झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकता . यासाठी २ चमचे हळद, १ कप कडुलिंबाचे तेल आणि ५ चमचे लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून घ्यावा. आता हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी जिथून झुरळ बाहेर पडत असतील त्या ठिकाणी फवारणी करा. २ ते ३ दिवस सतत वापरल्यानंतर आपल्याला घरात एकही झुरळ दिसणार नाही.

पावसाळ्यात किचनमध्ये कुबट वास येतो ? ६ टिप्स, स्वयंपाकघरात वाटेल फ्रेश...

२. मुंग्या दूर करण्यासाठी उपाय :- पावसाळ्याच्या दिवसात घरात लाल, काळ्या मुंग्या येण्याचे प्रमाण खूपच वाढते. अशावेळी यापासून सुटका मिळवण्यासाठी हळदीमध्ये सम प्रमाणात मीठ मिसळून मुंग्यां येतात त्या ठिकाणी जमिनीवर पसरवून ठेवून द्या, यामुळे मुंग्या एका मिनिटात त्या ठिकाणाहून गायब होतात.

३. लहान किटकांना मारण्यासाठी हा उपाय करा :- पावसाळ्याच्या दिवसात घरात दिसणारे छोटे किटक दूर करण्यासाठी आपण लवंग पावडर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता, किंवा कापूर जळत ठेवू शकता. असे मानले जाते की किटक त्याचा तीव्र वास सहन करू शकत नाहीत आणि लगेच मरतात.

२ स्मार्ट झटपट ट्रिक्स, प्लास्टिक पिशवीची घाला नाजूक -लहानशी घडी, शेकडो पिशव्या सहज साठवा!

४. पावसाळी कीटकांना अशा प्रकारे घरापासून दूर ठेवा :- पावसाळ्यात आपले घर किटक व किटकांपासून मुक्त ठेवायचे असेल तर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत, दररोज डस्टबिन रिकामे करण्यापासून ते झाडून काढणे आणि मॉपिंग करणे खूप महत्वाचे आहे. तसेच, मॉपिंग वॉटरमध्ये व्हिनेगर किंवा जाडे मीठ घालण्यास विसरू नका.

मळके सॉफ्ट टॉईज धुण्याच्या सोप्या ४ पद्धती, सॉफ्ट टॉईज होतील स्वच्छ, चमकदार...

टॅग्स :सोशल व्हायरल