आंघोळ केल्यानंतर बरेचदा आपले डोळे लालबुंद होतात. आपल्यापैकी अनेकजणांना आंघोळीनंतर या समस्येचा सामना करावा लागतो. शरीराच्या सगळ्यांत नाजूक अवयवांपैकी डोळे हा एक महत्वाचा भाग आहे. काहीवेळा डोळ्यांना इंफेक्शन झाल्यास देखील डोळे लाल होतात. डोळे हा नाजूक अवयव असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आंघोळ केल्यानंतर डोळे लाल होतात त्याचबरोबर डोळ्यांची जळजळ होण्यास सुरुवात होते. असे असले तरीही थोड्या वेळाने आपले डोळे आहेत तसेच नॉर्मल होतात(Why do our eyes become red after taking a shower).
आंघोळीनंतर डोळे लाल होण्याची ही समस्या खूपच कॉमन आहे. बऱ्याच लोकांना हा त्रास जाणवतो, पण त्यामागचं कारण माहीत नसतं. आंघोळ झाल्यानंतर डोळे जड होतात, लाल होऊन सुजल्यासारखे वाटतात. आंघोळीनंतर डोळे लाल होण्याची नेमकी कारणं कोणती व त्यावर घरगुती उपाय कोणते करता येऊ शकतात, ते पाहूयात(Why Are Our Eyes Red After a Shower Causes and Treatment).
आंघोळीनंतर डोळे लाल होण्याची मुख्य कारण....
१. आंघोळीनंतर डोळे लाल होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, आपण वापरत असलेले शाम्पू आणि साबण यात बरेचसे हार्श केमिकल्स असतात. याच हानिकारक केमिकल्सचा काही अंशी आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो. शाम्पू आणि साबणात अमीनो ॲसिड सारखे हानिकारक केमिकल्स असतात जे आपल्या डोळ्यांच्या संरक्षणात्मक थराला नुकसान पोहोचवतात. यांच्या सतत वापराने डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि लालसरपणा येतो.
२. जर आंघोळीच्या पाण्यात क्लोरीनचे प्रमाण अधिक असेल तर यामुळे देखील डोळे लाल होऊ शकतात. ज्या पाण्यांत अधिक प्रमाणांत क्षार असतात अशा क्षारयुक्त पाण्याचा वापर केल्याने देखील डोळे व त्वचा यांना हानी पोहचू शकते. क्षारयुक्त पाण्याचा सतत वापर केल्यास आपले डोळे डिहायड्रेटेड होऊ शकतात. क्षारयुक्त पाणी म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांचे प्रमाण अधिक असणारे हार्ड वॉटर. जेव्हा आपण अशा पाण्यात जास्त वेळ आंघोळ करतो तेव्हा डोळ्यांना त्रास होतो.
३. कधीकधी पाण्यात घाण किंवा बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर असतात. अशा एलर्जिक घटकांमुळे देखील डोळे लाल होतात. खूप गरम पाण्याने आंघोळ केल्यानेही डोळे लाल होतात. गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळ्यांच्या रक्तवाहिन्या गोठतात.
४. काहीवेळा आपण चेहऱ्यावरील मेकअप स्वच्छ न करता तशीच आंघोळ करतो. असे केल्याने मेकअप मधील केमिकल्सयुक्त घटक डोळ्यांत गेल्याने देखील डोळे लाल होतात. जर आपण सतत लॅपटॉप, मोबाईल यांसारखे स्मार्ट स्क्रीन यूजर असाल आणि आपण कडक गरम पाण्याने आंघोळ करत असाल तरी देखील आपले डोळे लाल होऊ शकतात.
डोळे लाल होऊ नयेत म्हणून काय करावे (How to get rid of red eyes after shower)
१. बर्फाने डोळे शेकून घ्यावेत.
२. आंघोळीसाठी फिल्टर केलेले पाणी वापरा.
३. कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करावी.
४. शाम्पू किंवा साबण वापरताना ते डोळ्यांत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.