सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये ‘महिला विद्यार्थिनी, तिची शिक्षिका, शिक्षकांचे पर्यवेक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचा एकच पती आहे’ असे लिहिले आहे. सदर पोस्टचा स्क्रीनशॉट लाइफ इन सौदी अरेबियाचा आहे. अनेक नेटिझन्सनी त्यांच्या प्रोफाईलवरून ही पोस्ट शेअर केली आहे. लखनौ येथील भाजप आयटी सेलचे प्रमुख अभिषेक तिवारी म्हणाले, “शाळा शेख यांनीच बांधली असावी.”
OpIndia या वेबसाईटने व्हायरल झालेली ही पोस्ट खरी आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तपासणीदरम्यान आढळले की पोस्ट नवीन नसून आणि अनेक वर्षांपासून प्रसारित केली जात आहे. हा फोटो 2012 चा आहे जेव्हा तो लाइफ इन सौदी अरेबिया, इंडिपेंडंट आणि इतर अनेक पोर्टलवर प्रथम प्रकाशित झाला होता.
स्कूल भी शेख ने ही बनवाया होगा 😊😊 pic.twitter.com/N4Jn4jXvVs
— Abhishek Tiwari 🇮🇳 (@lkoabhishek) May 22, 2022
लाइफ इन सौदी अरेबियाच्या अहवालात या व्यक्तीने चौथ्यांदा लग्न केल्याचे म्हटले आहे. नवीन बायको अजून माध्यमिक शाळेत शिकत होती. योगायोगाने त्या माणसाची दुसरी पत्नी शाळेत शिक्षिका होती. त्याच्या इतर दोन बायका मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकाच्या पदावर होत्या.
समोर आलं ४८ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मलायकाचं फिटनेस सिक्रेट; दिवसभरात काय काय खाते? वाचा
गल्फ न्यूजच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की चारही महिला आनंदाने एकत्र राहत होत्या. ही पोस्ट एका पत्नीने (शिक्षकाने) शेअर केली होती, ज्यात तिनं पतीच्या इतर पत्नींबाबत खुलासा केला होता. गल्फ न्यूजनुसार, हे कुटुंब शाळेत चर्चेचा विषय बनले, कारण हे एक 'असामान्य प्रकरण' होते.
सासू असावी तर अशी! लग्नात सुनेची साडी व्यवस्थित करताना दिसल्या सासूबाई, पाहा व्हिडिओ
अहवालानुसार आणखी एका शिक्षकाने सांगितले की, "आम्ही अनेकदा याबद्दल बोलतो आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी याकडे एक विनोद म्हणून पाहतात. मुख्याध्यापक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यी यांचे एकमेकांशी वर्तन अगदी सामान्य असते.