प्रसुती कळा सुरू झाल्यापासून बाळाला जन्म देण्यापर्यंतचा काळ प्रत्येक स्त्रीसाठी खूप कठीण असतो. अशावेळी योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. सोशल मीडियावर एका गर्भवती महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकताा गर्भवती महिलेला घेऊन जाणारी एक रिक्षा रस्त्यातच बंद पडते. रिक्षा अचानक बंद झाल्यानं रिक्षा चालक इतर वाहनांना थांबवण्यासाठी प्रयत्न करतो. जेणेकरून वेदनेनं विव्हळणाऱ्या या महिलेला लवकरात लवकर रुग्णालयत पोहोचवता येईल. (Viral video of woman stopping bmw to help pregnant woman)
humanity still alive❣️ pic.twitter.com/vemGhZCqp8
— PandeyG (@MrPandeyG) December 7, 2021
बराचवेळ प्रयत्न करूनही एकही वाहन थांबायला तयार नव्हते. नंतर एक BMW मागच्या दिशेने आली. या कारमधून बाहेर आलेल्या एका शाळकरीनं मुलीनं मदतीचा हात दिला. चिमुरडीनं रुग्णालयात जाण्यास केलेल्या मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
कमालच केली! जीन्स घालूनच चालणार सप्तपदी; लग्नासाठी मुलीची अनोखी अट; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले....
हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमधील क्लिप असल्याचे दिसते आणि त्यात रेकॉर्डिंग बटण, वेळ, तारीख सर्व दिसत आहे. तमिळ न्यूज वेबसाइट्स - TV5 न्यूज आणि तमिलस्पार्क - यांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 'मानवता अजूनही शिल्लक आहे' या मथळ्यांसह घटना लोकांसमोर मांडली आहे.
ही घटना एक जीवंत उदाहरण आहे आणि प्रसूती वेदनांनी त्रस्त असलेल्या एका महिलेसाठी बीएमडब्ल्यू कारमध्ये असलेल्या चिमुरडीनं धाव घेतली. लहान मुलगी, देवीच्या रूपात दिसून आल्याचं त्यांनी म्हटलंय.आतापर्यंत ५९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर ९०० पेक्षा जास्त लोकांनी कमेंट करत या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय आहे या व्हिडीओमागचं सत्य? (Fact check )
हा एक स्क्रिप्टेड व्हिडिओ आहे. अभिनेता आणि माजी तेलुगु बिग बॉस स्पर्धक लोबो यांने तयार केला आहे. फेसबुकवर त्याचे 496K फॉलोअर्स आहेत. तो नेहमीच त्याच्या पेजसाठी असे व्हिडिओ तयार करण्यासाठी ओळखला जातो. "बघितल्याबद्दल धन्यवाद! कृपया लक्षात ठेवा की या व्हिडीओ स्क्रिप्टेड ड्रामा आहे. या लघुपट केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे!,” अशी माहिती या व्हिडीओसह पोस्ट करण्यात आली आहे.