Lokmat Sakhi >Social Viral > पृथ्वीवर येऊन लग्न करण्यासाठी पैसे दे म्हणत नकली अंतराळवीराने ‘तिच्या’कडून उकळले २५ लाख; सरकली पायाखालची जमीन...

पृथ्वीवर येऊन लग्न करण्यासाठी पैसे दे म्हणत नकली अंतराळवीराने ‘तिच्या’कडून उकळले २५ लाख; सरकली पायाखालची जमीन...

Fake Astronaut Cheated on Woman for 25 Lakh Rupees : एखाद्या चित्रपटाची वाटावी अशीच ही कथा. पण ती प्रत्यक्षात घडली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 04:03 PM2022-10-12T16:03:51+5:302022-10-12T16:12:10+5:30

Fake Astronaut Cheated on Woman for 25 Lakh Rupees : एखाद्या चित्रपटाची वाटावी अशीच ही कथा. पण ती प्रत्यक्षात घडली आहे.

Fake Astronaut Cheated on Woman for 25 Lakh Rupees : Fake astronaut extorts 25 lakhs from 'her' by saying to pay money to come to earth and get married; The ground has slipped... | पृथ्वीवर येऊन लग्न करण्यासाठी पैसे दे म्हणत नकली अंतराळवीराने ‘तिच्या’कडून उकळले २५ लाख; सरकली पायाखालची जमीन...

पृथ्वीवर येऊन लग्न करण्यासाठी पैसे दे म्हणत नकली अंतराळवीराने ‘तिच्या’कडून उकळले २५ लाख; सरकली पायाखालची जमीन...

Highlightsहा बनावट अंतराळवीर नेमका कोण आहे किंवा त्याची पार्श्वभूमी काय याबाबत मात्र अद्याप काहीही समजू शकले नाही.  महिलेने त्याला टप्प्याटप्प्यांमध्ये ४.४ दशलक्ष येन म्हणजेच तब्बल २४.८ लाख रुपये पाठवले.

एखादा अंतराळवीर आपल्याला संपर्क करतो आणि त्याला आपल्याविषयी प्रेम वाटत असल्याचे सांगतो. इतकेच नाही तर बरेच दिवस एकमेनी चॅटींग केल्यावर या दोघांचे सूक चांगलेच जुळते आणि मग मी पृथ्वीवर आलो की आपण लग्न करु अशा आणाभाकाही हे घेतात. खरी गोष्ट याच्या पुढी सुरू होते, ती म्हणजे आपल्याकडे पृथ्वीवर येण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे हा अंतराळवीर संबंधित महिलेला पैशांची मागणी करतो. प्रेमात आकंठ बुडालेली ही महिला या अंतराळवीरावर विश्वास ठेवते आणि त्याला तब्बल २५ लाख रुपये देते. एखाद्या चित्रपटाची वाटावी अशीच ही कथा. पण ती प्रत्यक्षात घडली आहे (Fake Astronaut Cheated on Woman for 25 Lakh Rupees). 

(Image : Google)
(Image : Google)

त्याचे झाले असे की जपानमधील एका ६५ वर्षीय महिलेची जूमनध्ये एका व्यक्तीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या व्यक्तीने आपली ओळख रशियातील अंतराळवीर अशी करुन दिली. या दोघांनी मेसेजवर चॅटींग सुरू केले. काही काळाने ते दोघे एका जपानी अॅपवर कनेक्ट झाले. अंतराळवीर म्हणून भासवलेल्या व्यक्तीच्या इन्स्टाग्रामवर अंतराळातील काही छायाचित्रे होती, त्यावरुन या वृद्ध महिलेला हा अंतराळवीर असल्याचे वाटले. त्या व्यक्तीनेही आपण अंतराळवीर असल्याचे सांगत महिलेशी संवाद सुरू ठेवला. मग या व्यक्तीने आपल्याला पृथ्वीवर यायचे असून जपानमध्ये महिलेसोबत नवीन जीवन सुरू करायचे असल्याची कहाणी रचली. 

(Image : Google)
(Image : Google)

मात्र रॉकेटने पृथ्वीवर आणि जपानमध्ये यायला आपल्याला फि भरावी लागणार असून त्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगत या बनावट अंतराळवीराने महिलेकडे पैशांची मागणी केली. या महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला टप्प्याटप्प्यांमध्ये ४.४ दशलक्ष येन म्हणजेच तब्बल २४.८ लाख रुपये पाठवले. मात्र त्यानंतरही तो सातत्याने पैशांची मागणी करत राहील्यावर मात्र महिलेला संशय आला आणि तिने या व्यक्तीची पोलिसात तक्रार नोंदवली. हा आंतरराष्ट्रीय प्रेम घोटाळा आहे असे मानत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणातील तपास सुरू असून हा बनावट अंतराळवीर नेमका कोण आहे किंवा त्याची पार्श्वभूमी काय याबाबत मात्र अद्याप काहीही समजू शकले नाही. 

Web Title: Fake Astronaut Cheated on Woman for 25 Lakh Rupees : Fake astronaut extorts 25 lakhs from 'her' by saying to pay money to come to earth and get married; The ground has slipped...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.